शून्यातून करोडोंचे साम्राज्य उभ्या करणाऱ्या व्यक्तीच कथा | Motivational Story | Kōnosuke Matsushita

या पोस्ट मध्ये आहे मोटिवेशनल स्टोरी इन मराठी(Motivational Story In Marathi). आज आपण ज्या व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ती व्यक्ती जास्त शिकलेली नाही. फक्त त्याच्याजवळ असणाऱ्या विश्वासावर त्याने 70 बिलियन डॉलर वर्षाखेरीस Turnover असणारी कंपनी ची सुरुवात केली. चला तर मग सुरवात करूया या आपल्या Motivational Story Of Kōnosuke Matsushita In Marathi ला.

शून्यातून करोडोंचे साम्राज्य उभ्या करणाऱ्या व्यक्तीच कथा | Motivational Story In Marathi

motivational story of Konosuke matsushita in marathi

जपानमध्ये आजपासून जवळपास एकशे पंचवीस वर्षांपूर्वी एका गरीब कुटुंबांमध्ये कोनोसुके नावाच्या मुलाने जन्म घेतला. कोनोसुके जेव्हा नऊ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांना आर्थिक तंगी असल्यामुळे त्यांच्या गावाकडे असलेली सर्व जमीन विकावी लागली व घरदेखील विकावे लागले. त्यामुळे गावाकडे काहीच राहिले नाही म्हणून त्यांनी शहराकडे आपला मार्ग वळवला आणि शहरात कोनोसुके चे वडील मिळेल ते काम करू लागले.

घरची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे नऊ वर्षीय कोनोसुकेलादेखील एका दुकानात काम करावे लागले. तिथे तो सूर्य उगवायच्या आधी उठत दुकानाची साफ-सफाई करत, त्याचबरोबर दुकानातील अजून छोटीमोठी कामे तो करत असे. ती सर्व कामे झाल्यानंतर न तो त्या दुकानाच्या मालकाच्या मुलांची सेवा करत. कित्येक महिने असेच जाऊ लागले.

दुकान नीट चालत नसल्या कारणामुळे कोनोसुकेला त्या दुकानाच्या मालकांनी कामावरून काढून टाकले. त्यानंतर कोनोसुकेने एका सायकल विक्रेत्याकडे नोकरी केली. त्या काळात सायकल एक लक्झरी गोष्ट म्हणून ओळखली जात होती आणि युनायटेड किंगडम मधून ती इम्पोर्ट केली जात होती. ह्याच शॉप वर सायकल विकण्या बरोबरच मेटल शॉप चे पण काम होत होते म्हणून कोनोसुकेला बऱ्याच Machines शिकायला मिळाल्या. कोनोसुकेने येथे जवळपास पाच वर्ष काम केले आणि जेव्हा त्याचे वय वर्ष 15 झाली तेव्हा तो नवीन काहीतरी शोधू लागला.

भविष्यात वाढणाऱ्या ऊर्जेच्या वापरामुळे त्याला वाटले की आपण ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये नोकरी केली पाहिजे आणि काही दिवसांतच त्याला Osaka लाईट कंपनी ची जाहिरात दिसली. त्यामध्ये कंपनीला नवीन कामगारांची गरज होती आणि तिथे नोकरीसाठी अर्ज दिल्यावर कोनोसुकेला तेथे नोकरी देखील मिळून गेली. तेथे कामाबरोबरच कोनोसुकेला भरपूर नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या. तो कामाबरोबरच हळूहळू इलेक्ट्रिसिटी च्या संदर्भातील पुस्तके वाचू लागला व त्यामधूनच छोटे-मोठे एक्सपिरिमेंट करू लागला.

विसाव्या वर्षी त्याचे लग्न झाले आणि थोडीफार जबाबदारी देखील त्याच्यावर पडली. वयाच्या बाविसाव्या वर्षी तो त्याच्या कामामुळे कंपनीत टेक्निकल इंस्पेक्टर बनला. त्याने एक इलेक्ट्रिसिटी चे सॉकेट बनवले आणि त्याच्या बॉसला दाखवले परंतु त्याच्या बॉसला त्याची आयडीया पसंत पडली नाही. आणि म्हणाला “हे मार्केटमध्ये चालू नाही शकणार” परंतु कोनोसुकेला त्याच्या त्या इलेक्ट्रिक सॉकेट वर पूर्ण विश्वास होता ,की हे सॉकेट मार्केटमध्ये नक्कीच चालेल याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी नोकरी सोडून स्वतःचेच काम करणे हे उचित समजले.

त्याने जेव्हा त्याच्या मित्रांना सांगितले तेव्हा त्याच्या मित्रांनी देखील त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की एवढी चांगली नोकरी सोडतोयस ते पण अशा प्रॉडक्ट साठी जे प्रॉडक्ट तुझ्या अनुभवी बॉसने देखील रिजेक्ट केले आहे हे ‘सांगून की ते मार्केटमध्ये चालणार नाही’ , आणि त्यावर तू जास्त शिकलेला देखील नाहीस आणि ना तुझ्याकडे बिझनेस करण्याचा काही अनुभव आहे तुझे यशस्वी होणे हे जवळपास अशक्यच आहे.

परंतु त्याला स्वतःवर आणि त्यांनी बनवलेल्या प्रॉडक्ट वर खूप विश्वास होता. म्हणून त्यांनी नोकरी सोडली. त्याने त्याच्या बरोबर काम करत असलेली दोन कामगार, एक मित्र, त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी या सर्वांना मिळून एक त्यांच्या घरातच एक छोटीशी फॅक्टरी चालू केली. आता या फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिक सॉकेट बनवू लागले आणि कोनोसुके स्वतः जागोजागी जाऊन ते सॉकेट विकू लागला परंतु त्याच्या त्या लाईट सॉकेट ला प्रत्येक ठिकाणी रिजेक्ट केले जात होते.

कित्येक महिने जाऊ लागले परंतु त्याला छोट्या-मोठ्या ऑर्डरच भेटत होत्या. त्या एकदम त्या इतक्या क्षुल्लक होत्या की त्यामध्ये त्याचा खर्च भागवणे देखील कठीण होते. अशा ह्या खडतर क्षणांमध्ये त्याचे ते दोन वर्कर जे त्याच्याबरोबर काम करत होते त्यांनी देखील त्याची साथ सोडली आता काम करण्यासाठी फक्त तीनच व्यक्ती उरले होते.

आर्थिक स्थिती इतकी हालाखीची होत गेली की त्याला स्वतःचे घर चालवणे देखील शक्य होत नव्हते म्हणून तो घरातील वस्तू विकून स्वतःचा खर्च भागू लागला आणि आणि त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला कर्ज देखील घ्यावे लागले.

प्रत्येक ठिकाणी त्याला फक्त भेटले ते फक्त रिजेक्शन रिजेक्शन आणि रेजेक्शन. आता त्याला वाटत होते की बास झाले परंतु त्याला त्याच्या स्वतःच्या सॉकेट वर विश्वास होता म्हणून तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहिला आणि पुन्हा पुन्हा त्यात फेल होत राहिला.

परिस्थिती इतकी बिकट झाली होती ती की आता कोनोसुकेकडे फक्त एकच पर्याय होता तो म्हणजे नोकरी करणे. हाच सल्ला त्याच्या मित्रांना देखील त्यांना त्याला दिला परंतु कोनोसुकेचा त्याच्या प्रॉडक्ट वर असलेला विश्वास हा इतका प्रदीर्घ होता की तो हार मानायला तयार नव्हता.

दिवस जात होते परिस्थिती बिकट होत होती. अशातच एक आशेची किरण त्यांना दिसली व त्यांच्या कंपनीला 1000 इलेक्ट्रिक सॉकेट बनवण्याची पहिली मोठी ऑर्डर भेटली त्यानंतर त्याच्या बिझनेस ने एक अशी झेप घेतली कितो मागे वळून पाहिलेच नाही आणि आज त्या कंपनीत अडीच लाखापेक्षा जास्त लोक काम करत आहेत ज्याचे वर्षाखेरीस उत्पन्न 70 बिलियन डॉलर इतके आहे.

हे सर्व त्या व्यक्तीने केले जो जास्त शिकलेला नव्हता, ना त्याच्याकडे जास्त पैसा होता आणि ना कुणाचा पाठिंबा. त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे त्याचा स्वतःवर असलेला विश्वास. तुम्ही या कंपनीचे प्रोडक देखील वापरले असतील या कंपनीचे नाव आहे पॅनासोनीक.

हो तुम्ही ही बरोबर वाचले आहे पॅनासोनीक. ही कंपनी उभी राहिली फक्त आणि फक्त एका व्यक्तीच्या विश्वासावर ती व्यक्ती म्हणजे कोनोसुके.

मित्रांनो ही गोष्ट (Motivational Story Of Kōnosuke Matsushita In Marathi) होती एका व्यक्तीच्या विश्वासाची. काय तुमच्याकडे देखील असे एखादी गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावा लावाल. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी मोकळाच आहे तिथे कमेंट करून ह्या जगाला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही तुमचे सर्व व सर्वस्व पणाला लावा पण ते करून दाखवालच.

जर तुम्हाला ही Motivational Story Of Kōnosuke Matsushita In Marathi आवडली असेल तर नक्कीच आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आमच्या पेजला आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.

Read More
Categories