बॅडमिंटनची संपूर्ण माहिती - मैदान, नियम, इतिहास | Badminton Information In Marathi

badminton information in marathi

बॅडमिंटन हा एक अतिशय रोमांचक असा खेळ आहे. आपण Badminton Information In Marathi पाहणार आहोत. बॅडमिंटन हा खेळ तसा देशांमध्यें खेळला जातो. भारतामध्ये देखील हा खेळ भरपूर लोकप्रिय आहे.

बॅडमिंटन ऑलंपिक मध्ये तर खेळला जातोच परंतु बॅडमिंटन इतर टूर्नामेंट मध्येदेखील खेळला जातो. बॅडमिंटन खेळामध्ये लागणाऱ्या मुख्य गोष्टी म्हणजे शटलकॉक आणि रॅकेट. तसेच बॅडमिंटन मध्ये नेट देखील आवश्यक असते. आता आपण History Of Badminton व Rules Of Badminton जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

बॅडमिंटनचा इतिहास (History Of Badminton)

बॅडमिंटन हा खेळ तसे पाहता फार जुना नाही. या खेळाची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात झाली असे जाणकारांचे मानणे आहे. याचा शोध हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लावला. सुरुवातीच्या काळात शटलकॉक च्या जागी लोकरीचे गोळे वापरले जात असत. शटलकॉक चा शोध हा नंतर लागला.

सुरुवातीच्या काळात बॅडमिंटन हा खेळ ४-४ लोक खेळत असत त्यानंतर सिंगल्स आणि डबल्स या श्रेणी आमलात आल्या. १९३४ च्या जवळपास "बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन " अस्तित्वात आले आणि या खेळासाठी नवीन नियम बनविले गेले.

भारतामध्ये या खेळाची प्रचिती सायना नेहवाल, पी. वी. सिंधु, श्रीकांत, पुलेला गोपीचंद यांच्यामुळेच आली असे म्हणायला हरकत नाही.

बॅडमिंटनची माहिती (Badminton Information In Marathi)

बॅडमिंटन खेळासाठी लागणाऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक. रॅकेट हे कार्बन फायबर चे बनविलेले असते आणि त्याचे काम हे शटलकॉक ला मारणे हे असते. हे रॅकेट वजनाने एकदम हलके असते (जवळपास ८०-९० ग्रॅम) जेणेकरून खेळाडूला उत्तम प्रकारे खेळता येईल. ह्याची लांबी साधारणपणे ६८० मिमी व रुंदी २३० मिमी असते. रॅकेट चा आकार अंडाकृती असतो आणि त्याला पकडण्यासाठी एक हॅन्डल दिलेला असतो. शटलकॉक हे सुमारे ७० मिमी लांबीचे असते आणि त्याला १६ पंख असतात.

बॅडमिंटन हा खेळ महिला व पुरुष दोघेही खेळतात. हे सिंगल्स किंवा डबल्स मध्ये खेळले जाते. सिंगल मध्ये प्रत्येक बाजूस १-१ खेळाडू तसेच डबल्स मध्ये प्रत्येक बाजूस २-२ खेळाडू असतात. बॅडमिंटन हा खेळ एकत्रितरित्या देखील खेळला जातो ज्यामध्ये १ महिला १ पुरुष असे गट असतात.

बॅडमिंटन खेळाचे मैदान (Badminton Court Information )

badminton information in marathi

बॅडमिंटन खेळण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे मैदान ज्याला 'बॅडमिंटन कोर्ट ' म्हणतात.

बॅडमिंटन कोर्ट च्या मध्यभागी नेट (जाळी) बसविलेली असते. सिंगल साठी असणाऱ्या कोर्ट ला सिंगल कोर्ट व डबल्स साठी असणाऱ्या कोर्ट ला डबल्स कोर्ट असे म्हणतात. दोन्ही कोटी ची लांबी हि ४४ फूट असते परंतु सिंगल कोर्ट ची रुंदी हि १७ फुट व डबले कोर्ट ची रुंदी २० फूट असते.

कोर्ट च्या मध्यभागी जाळी (नेट) बांधलेली असते त्यामुळे मैदानाचे २ सामान भागात विभाजन होते. याच जाळीपासून ६फूट ६ इंच अंतरावर शॉर्ट सर्विस लाइन (Short Service Line) असते.

डबल्स मध्ये लॉन्ग सर्विस लाइन असते. हि बाहेरील बाजूपासून २ फूट ६ इंच अंतरावर असते.

बॅडमिंटन खेळाचे रूल्स (Rules Of Badminton)

जो खेळाडू सर्विस करतो तेव्हा त्याने मारलेले शटलकॉक हे त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या शॉर्ट सर्विस लाईन च्या फुडें गेले पाहिजे नाहीतर तो फाऊल मानला जातो. सिंगल्स मध्ये खेळाच्या सुरुवातीला स्पर्धक तिरके उभे राहतात व तेच डबल्स मध्ये समोरासमोर राहतात परंतु डबल्समध्य शटलकॉक मारताना हे डाव्या बाजूचा खेळाडू प्रतिस्पध्याच्या डाव्या बाजूच्या खेळाडूंकडे मारतो.

सर्विस करताना रॅकेट चा अंडाकृती भाग हा खाली असला पाहिजे व शटलकॉक हे नेहमी कमरेच्या खालच्या बाजूनेच मारावा लागतो. जर हात कमरेपासून वर गेल्यास त्यास ओव्हरहँड म्हणतात.

जर सर्विस करताना चुकली तर सिंगल मध्ये प्रतिस्पर्ध्याला व डबल्स मध्ये साथीदाराला सर्विस करण्याची संधी मिळते.

पद्धत Method Of Badminton

खेळाच्या सुरुवातीलाच टॉस केला जातो. टॉस जिंकणारा ठरविता कि त्याला सर्विस करायचीय का दिशा निवडायचेय.

सर्वप्रथम शटलकॉक प्रतिस्पर्धीच्या बाजूला मारणे यालाच सर्विस म्हणतात. हे शटलकॉक मारताना ते जाळीवरून (नेटवरून ) जाणे गरजेचे असते.

शटलकॉक ला असे मारायचे कि प्रतिस्पर्धी पुन्हा ते आपल्याकडे मारू शकणार नाही. जर असे झाले तरच आपल्याला गुण मिळतो.

शटलकॉक मारताण ते जाळीला (Net) लागले अथवा अडकले अथवा मैदानाबाहेर गेले की प्रतिस्पर्धी व्यक्तीला गुण भेटतात.

बॅडमिंटनच्या सामन्यात तीन गेम्स (सेट) असतात. प्रत्येक सेट हा २१ गुणांसाठी खेळला जातो. जो जास्तीत जास्त गेम्स (सेट) जिंकतो तो सामना जिंकतो.

परंतु जिंकायचे झाले तर विरोधी स्पर्धकापेक्षा २ गुण अधीक असणे आवश्यक असते. जर दोन्ही स्पर्धकांस २०-२० गुण असतील तर जिंकण्यासाठी २२-२० गुण असणे म्हणजेच प्रतिस्पर्ध्यापेक्षा २ गुण अधिक असणे आवश्यक असते. हाच सामना ३० गुणांपर्यंत खेळविला जातो आणि दोन्ही स्पर्धकांस २९-२९ गुण असतील तर फुढील १ गुण घेणारा स्पर्धक विजेता ठरतो.

Read More
Categories