Business idea In Marathi
Business idea In Marathi: आज आम्ही तुम्हाला फावल्या वेळामध्ये एक ते दोन तास ऑनलाइन काम करून (Business idea In Marathi) ज्यादा चे पैसे कसे मिळवावे याचे 4 मार्ग सांगणार आहे. इंटरनेटवर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही एक्स्ट्रा पैसे कमवू शकता ते सुद्धा अगदी थोडा कुशलतेवर.
1.इमेजेस चा बॅकग्राऊंड रिमूव करून:(Business idea In Marathi 1)
मित्रांनो आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाइन येऊ लागल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे ऑनलाइन विकत असणाऱ्या प्रॉडक्ट ची एक सुंदर इमेज. जे लोक ऑनलाईन वस्तू विकत असतात त्यांना बॅकग्राऊंड नसलेल्या म्हणजेच पांढऱ्या बॅकग्राउंड मध्ये असलेल्या इमेजेस हव्या असतात.
(तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर किंवा कोणत्याही शॉपिंग साइटवर असणाऱ्या प्रोडक्सच्या इमेजेस या पूर्णतः व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये असतात हे देखिल पाहिले असेल.) परंतु जे लोक ऑनलाईन वस्तू विकत असतात त्यांच्याकडे एवढी स्किल किंवा वेळ नसतो म्हणून ते अशा गोष्टी करण्यासाठी ऑनलाइन फ्रीलान्सर ( ऑनलाइन काम करत असणाऱ्या व्यक्ती ) लोकांना देतात.
आपण या मधून कसे पैसे कमवू शकतो?
यासाठी आपल्याकडे Fiverr चे अकाउंट असणे गरजेचे आहे. आपल्याला यासाठी विशिष्ट असे स्कील असणे आवश्यक नाही फक्त थोडेसे स्किल शिकावे लागेल. Photopea.com ही वेबसाईट आहे त्यावर तुम्ही ऑनलाइन एखाद्या इमेज चा बॅकग्राऊंड काढू शकता. जर तुम्हाला Photoshop हे व्यवस्थित चालवण्यास येत असेल तुम्हाला Photopea.com वापरायची देखील गरज पडणार नाही.
परंतु आम्हाला फोटोशॉप आणि Photopea हे दोन्ही येत नाहीत? मग आता कसे करणार? तुम्ही remove.bg या वेबसाईटद्वारे देखील कोणत्याही स्किल शिवाय बॅकग्राऊंड काढू शकता परंतु यामध्ये असणारी त्रुटी ही एकच आहे की यामध्ये मिळणारी इमेज ही तुम्हाला कमी क्वालिटीची मिळते. जर तिच इमेज तुम्हाला जास्त क्वालिटीची हवी असेल तर तुम्हाला या वेबसाइटला थोडे पैसे द्यावे लागतात. अशा पद्धतीने देखील तुम्ही स्किल नसताना देखील थोडेसे पैसे गुंतवून ऑनलाइन स्वरूपात पैसे कमवू शकता.
2. लोगो डिझाईनिंग (Business idea In Marathi 2)
एखादी कंपनी, वर्कशॉप किंवा वेबसाईट जर आपल्याला ऑनलाइन स्वरूपात आणायची असेल तर त्यासाठी लोगो हा महत्त्वाचा असतो. यावरूनच त्या कंपनी वर्कशॉप किंवा वेबसाईटची ओळख लोकांना होते. तर हा लोगो फुकट मध्ये कसा बनवायचा हे आपण पाहूयात.
प्रथमतः तुम्हाला www.freelogodesign.org या वेबसाईटवर जावे लागेल. नंतर तुम्हाला वेगवेगळ्या श्रेणी पहायला मिळतील.
तुम्हाला ज्या गोष्टीचा लोगो बनवायचा आहे त्या श्रेणी वर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर ही वेबसाइट तुम्हाला त्या श्रेणी मधील वेगवेगळ्या प्रकारचे लोगो चे डिझाईन्स दाखवेल. तुम्हाला जे आवडेल ते निवडा आणि त्यामध्ये हे हवे तसे बदल घडवून तुम्हाला हवा असणारा लोगो बनवा.
ते झाल्यानंतर तुम्ही हा लोगो कोणतेही पैसे न मोजता डाऊनलोड करू शकता. अशाप्रकारे तुम्ही लोगो बनवण्याची ही सर्विस तुमच्या परिसरातील लोकांना देऊन त्यामधून पैसे कमवू शकता.
3. युट्यूब व्हिडिओ बनवणे: (Business idea In Marathi 3)
कॅमेऱ्यासमोर आपले तोंड दाखवायची इच्छा नसेल तरीदेखील तुम्ही युट्युब वर व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही ही आयडिया आज देणार आहोत त्याचबरोबर अशा यूट्यूब चैनल चा लिंग सुद्धा देणार आहोत याचा तुम्ही अभ्यास करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही यूट्यूब चैनल निवडू शकता.
A फॅक्ट संदर्भात युट्यूब व्हिडिओ बनवणे.
यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दाखवण्याची गरज नाही फक्त तुम्ही तुमच्या आवाजामध्ये व्हिडिओ तयार करून त्यामध्ये फ्री मध्ये उपलब्ध असलेले व्हिडिओज लावून तुम्ही ते युट्युब वर अपलोड करू शकता.
फ्री मध्ये व्हिडिओज कुठे भेटणार?
1.Pixabay.com 2.pexels.com
या चॅनेलचा थोडा अभ्यास करून तुम्ही अशा स्वरुपात व्हिडिओ आरामात बनवू शकता. चॅनेल इथे आहे.
B सामान्य माहिती देणारे व्हिडिओ:
यामध्ये तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीवर व्हिडिओ बनवू शकता आणि ते व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून फ्री मध्ये मिळणारे व्हिडिओज त्यामध्ये टाकून ते युट्युब वर अपलोड करू शकता.
तसेच तुम्ही व्हिडिओ स्क्राइब (Videoscribe) किंवा डूडली (Doodly) या पेड सॉफ्टवेअरचा वापर करुन देखील तुम्ही वाईट बोर्ड ॲनिमेशन बनवू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या श्रेणी निर्माण करू शकता जसे की मनोरंजक गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी, सध्याचा चर्चेत असणारा विषयी आणि बरेच काही.
सध्या मार्केटमध्ये काय चालले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही गुगल ट्रेंडचा (Google Trends) वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला मागील चोवीस तासांमध्ये लोकांद्वारे कोणत्या गोष्टी जास्त सर्च केल्या जात आहेत म्हणजेच शोधले जात आहेत याबाबतची माहिती मिळते. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या व्हिडिओ चे टॉपिक्स निवडून त्यावर व्हिडीओ बनवू शकता. असे व्हिडिओ यूट्यूब वर व्हायरल होण्याची संभाव्यता इतर व्हिडिओच्या संभाव्यता पेक्षा जास्त असते.
या चॅनेलचा थोडा अभ्यास करून तुम्ही अशा स्वरुपात व्हिडिओ आरामात बनवू शकता. चॅनेल इथे आहे.
C. एका विशिष्ट श्रेणीमध्ये व्हिडिओ बनवणे:
मित्रांनो तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे अशा श्रेणी निवडून तुम्ही त्यामध्ये व्हिडिओ बनवू शकता. उदाहरणार्थ- आत्ता उपलब्ध असणारी टेक्नॉलॉजी, मार्केटमध्ये नवीन आलेल्या गोष्टी, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर अधिक प्रभुत्व असेल तर तुम्ही त्या गोष्टी व्हिडिओद्वारे इतरांशी मांडू शकता. जर तुम्हाला अधिक श्रेणी पहावयाचा असतील तर तुम्ही ही WikiHow या वेबसाईटवर जाऊन त्यांची कॅटेगरीज ही लिस्ट पाहू शकता यामध्ये भरपूर कॅटेगरीज म्हणजेच श्रेणी उपलब्ध आहेत यातून तुम्हाला विशिष्ट श्रेणी निवडण्यास नक्कीच मदत होईल.
4.इंस्टाग्राम द्वारे (Business idea In Marathi 4)
इंस्टाग्राम द्वारे देखील तुम्ही पैसे मिळू शकता. इंस्टाग्राम द्वारे पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
स्वतःचे प्रॉडक्ट विकणे.
विशिष्ट कम्युनिटी बनवून प्रमोशन्स द्वारे पैसे कमावणे.
स्वतः इन्फ्ल्यून्सर बनणे.
A.स्वतःचे प्रॉडक्ट विकणे
स्वतःचे प्रॉडक्ट म्हणजे जर तुम्ही एखादे प्रॉडक्ट स्वतः तयार करत असाल किंवा ते होलसेल मध्ये खरेदी करून विकत असाल किंवा तुम्ही जर स्वतः ई-बुक लिहिले असेल तर ते तुम्ही इंस्टाग्राम द्वारे विकू शकता. उदाहरणासाठी तुम्ही इंस्टाग्राम वर जाऊन "Marathi Business" किंवा "Business Marathi" असे सर्च करा. अशी भरपूर पेजेस मिळतील जे "Marathi Business Ideas " अश्या स्वरूपाचे ई-बुक विकतात.
B. विशिष्ट कम्युनिटी बनवून प्रमोशन्स द्वारे पैसे कमावणे.
विशिष्ट कम्युनिटी बनवून म्हणजेच विशिष्ट श्रेणीतील लोकांना एकत्र करून त्या लोकांना आपली सर्विस देणे. याद्वारे विशिष्ट श्रेणीतील लोक आपल्या इंस्टाग्रामशी जोडले जातील आणि जर एखाद्या उद्योजकाला त्या विशिष्ट श्रेणीतील लोकांना टारगेट करावयाचे असेल तर तो उद्योजक तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्याच्या बिजनेस ची माहिती तुमच्या इंस्टाग्राम च्या पेजवर देण्यासाठी सांगेल. ही माहिती तुम्ही तुमचा इंस्टाग्राम च्या पोस्ट किंवा स्टोरीज मध्ये टाकण्यासाठी तुम्ही ठराविक पैसे मागू शकता. हे पैसे तुमच्या असणाऱ्या followers वर अवलंबून असतात. जेवढे जास्त followers तेवढे जास्त पैसे.
उदाहरणार्थ तुम्ही इंजिनियर्स लोकांसाठी एक पेज बनवले. त्या पेजवर तुम्ही इंजिनियरिंग च्या संदर्भात असणारी माहिती दिली. एखादा व्यक्ती इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षांचे शिक्षण जर विद्यार्थ्यांना देत असेल तर तो व्यक्ती अशा इन्स्टाग्राम च्या पेजेस च्या एडमिन ला कॉन्टॅक्ट करतो. अशा पद्धतीने ते इंस्टाग्राम चे पेज असणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच एडमिनला पैसेही मिळून जातात आणि या सर्विस देणाऱ्या व्यक्तीला त्याचे ग्राहक देखील आरामात मिळून जातात. याच प्रकारे टिकटॉक या अँप्लिकेशन चे देखील काम चालते.
C.स्वतः इन्फ्ल्यून्सर बनणे.
तुम्ही विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांना इंस्टाग्राम वर फॉलो करत देखील असाल. हे एक प्रकारचे इंस्टाग्राम इन्फ्ल्यून्सरस आहेत. कोणताही ब्रँड त्यांच्या ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी या व्यक्तींना पैसे देतो व ही प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या कंपनीचे प्रमोशन्स करतात.
जर तुम्हाला यातून काहीतरी नवीन शिकायला भेटले असेल तर नक्कीच हा लेख इतरांसोबत शेअर करा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन बिझनेसच्या व इतर संदर्भात माहिती हवी असेल तर आमच्या फेसबुक पेजला नक्कीच लाईक करा. जर तुमची अजून काही इच्छा असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.
This post is all about Business Ideas In Marathi. This post include small real-life Business Ideas In Marathi with real-life examples. This post has 4 work from home Business Ideas In Marathi.