गुढीपाडवा संपूर्ण माहिती - Gudi Padwa Information In Marathi

गुढीपाडवा संपूर्ण माहिती, Gudi Padwa Information In Marathi

या लेखामध्ये आम्ही गुढीपाडवा संपूर्ण माहिती - Gudi Padwa Information In Marathi दिले आहेत. या लेखामध्ये जवळपास १०० पेक्ष्या जास्त गुढीपाडवा संपूर्ण माहिती - Gudi Padwa Information In Marathi नावे आहेत.

चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. श्रीरामांनी याच दिवशी वालीच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले होते. तेव्हा याच प्रजेने उत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या आणि त्यामुळे या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणण्यात आले. इतिहासाप्रमाणे,भगवान श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला त्याचे प्रतीक म्हणून लोकांनी आनंदाने घराबाहेर गुढ्या उभारल्या.

विजयाचे प्रतीक हे उंच असते म्हणूनच गुढी उंच उभी करतात. चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून श्रीराम परत आले तेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तो सण गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो असेही मानले जाते. असेही म्हणतात की गुढी ही सर्व वाईट शक्तींना आपल्यापासून दूर ठेवून आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीला आमंत्रित करते.

गुढीपाडवा हा दिवस मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण आपल्या घराला सुंदर फुलांनी सजवतो, आंब्याच्या पानांचे तोरण घराभोवती बांधतो . गुढी उभारण्याची प्रथा ही फार प्राचीन आहे .महाराष्ट्रीयन लोकांसाठी गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात आहे. गुढी उभारण्यासाठी बांबूची किंवा कळकाची मोठी काठी वापरली जाते.

त्या काठीला कोमट पाण्याने स्वच्छ धुतले जाते. नंतर काठीला चंदनाचा लेप आणि हळद कुंकू लावले जाते. काठीला वरील बाजूस नवीन वस्त्र , चाफ्याच्या फुलांचा हार, आणि साखरेची माळ लावली जाते.त्यानंतर घराच्या उजव्या बाजूस पाटावर गुडी उभी केली जाते .त्या दिवशी कडूनिंबाची पाने आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. कडुनिंबाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे.

मागील वर्षातील सर्व कडू गोष्टी संपवून नवीन वर्षाची सुरुवात गोडव्याने करावी असे प्रथा सांगते. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात.कारण कडुनिंबाच्या पानांमध्ये निर्जंतुक करण्याची क्षमता असते. त्यामुळे उन्हाळा मध्ये होणारा त्वचा विकारापासून आराम मिळतो. उन्हामध्ये पाणी तापवून त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घातली जाते यालाच ईळवणी असेही म्हणतात.

सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवली जाते. गुढीला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.(धने हे उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगी ठरते तसेच उन्हाळ्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे).

🚩गुडीचे महत्व

गुढी उभारण्यासाठी आपण कलश, फुलांचा हार ,साखरेची गाठी, आंब्याचा चाफ्याची फुले ,नवीन वस्त्र, बांबूची काठी आणि कडूनिब वापरतो पण त्यामागे ही काहीतरी शास्त्रीय कारण असू शकते.

🚩गुडीसाठी लागणाऱ्या कलशाचे महत्व

कलश हे यशश्री चे प्रतीक मानले जाते .कोणत्याही पूजे मध्ये कळशाला देवीचे रूप मानले जाते.कलशावर देवीचा मुखवटा लावून त्याची पूजा केली जाते .

🚩गुडीसाठी लागणाऱ्या काठीचे महत्व

गुढीची काठी म्हणजे सामर्थ्य. निसर्गाचे रक्षण करणे असाही संदेश यातून मिळतो. गुढीची काठी जशी कणखर आणि ताट उभी असते तसेच आपण आपल्या आयुष्यामध्ये ताठ मानेने जगले पाहिजे असा संदेश गुढी आपल्याला देते.

🚩गुडीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे महत्व

कडुनिंबाचे पाने ही आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. फुलांचा हार हे मांगल्याचे प्रतीक आहे.

फुलेही निसर्गाची मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे.

गुढीला नेसलेली जरीची साडी हे वैभवाचे प्रतिक आहे.

हळदीकुंकू हे तर सौभाग्याचे प्रतीक आहे.

श्रीफळ खूप पूजनीय आहे. श्रीफळ फोडूनच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात आपल्याकडे केली जाते . अतिथींचा सन्मान करण्यासाठी शाल व श्रीफळ दिले जाते.

पाट किंवा आसन हे आयुष्यामध्ये नेहमी स्थिर असल्याचा संदेश देतात.

पर्यावरण संवर्धनाचे प्रतिक असेही गुढीपाडव्याला मानले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली होती त्यामुळे हा सण निर्मितीचा मानला जातो. चैत्र महिन्यामध्ये एक नवीन चैतन्य फुललेले असते. प्राणी पक्षी सृष्टी हे नवीन चैतन्याने बहरलेले असतात. वृक्षांना नवीन पालवी फुटलेली असते. महाराष्ट्रीयन सणांमध्ये फळे-फुले वृक्ष पालवी यांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे या सर्वांचे संवर्धन व्हावे असाही संदेश यातून आपल्याला मिळतो.

गुढीपाडव्याचे निमित्त साधून लोक आपल्या संस्कृतीचे दर्शन करण्यास करण्यासाठी मिरवणुका काढतात त्या मिरवणुकांमध्ये लहान मुले मोठी माणसे आपले पारंपरिक वस्त्र परिधान करतात. या मिरवणुकांमध्ये कला दर्शन आजचे कार्यक्रम केले जातात.

गुडीचे कृषीविषयक महत्त्व ही अनन्यसाधारण आहे. गुढीपाडव्याला लोकसंस्कृती मध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. आपली धरती हा जगाचा गर्भाशय आहे आणि सूर्य तिच्यामध्ये बीज पेरतो आणि जमीन सुफलित होते.

Read More
Categories