मराठी सुविचार - Marathi Suvichar

मराठी सुविचार, Marathi Suvichar
आयुष्यात कोणाचाच विश्वास तोडू नका म्हणजे स्वतःचाही, कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास तुम्ही कदाचित परत मिळवू शकाल पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवूच शकत नाही.
जे अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा मजा असते आणि त्या मजेचा आनंद शक्य झाल्यावर द्विगुणित होऊन जातो.
जर एकाद्या वस्तूचा वापरच केला नाही तर ती गंजते, आणि जास्त वापरली कि ती झिजते. काहीही झाल तरी शेवट तर ठरलेलाच असतो, मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजण कधीही चांगलेच.
निराशावादी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवत असतात.
आपण कोणापेक्षातरी चांगले करिन याने काहीच फरक पडत नाही , पण आपण कोणाचे तरी नक्कीच चांगले केले याने बराच फरक पडतो.
प्रत्येकाने विचार करण्यासाठी वेळ घेतला पाहिजे , कारण तेच खरे शक्तीचे उगमस्थान आहे.
स्वतः चा विकास करा लक्ष्यात ठेवा, गती आणि जीवनामध्ये करत जाणारे चांगले बदल हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
आपण जे पेरतो तेच तर उगवते.
आपण कधीही वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपण आपली पतंग निश्चितच नियंत्रित करु शकतो.
आपण जन्म घेतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक मात्र रडत असतील.
आपले यशस्वी हिने हे तर आपल्या विचारांवरच अवलंबून असते.
उद्याचा उगवणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट करता येतात.
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानात गाळलेल्या घामामुळेच निर्माण होत असतो.
एका वेळी एकच काम करा आणि तेही एकाग्रतेने करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.
थोड्याश्या चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी व्यक्ती होय.
कधीही न करण्यापेक्षा थोडे उशीरा का होईना परंतु केलेले बरे.
एखाद्या कलेशिवाय जीवन असणे म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर होय.
फक्त ज्ञान असून उपयोग होत नाही, ते कधी, केव्हा आणि कसे वापरायचे महत्वाचे .
खरं आणि खोटं यात फक्त नी फक्त चार बोटांचं अंतर आहे, आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं होय.
जसा गेलेला बाण परत येऊ शकत नाही तसेच गेलेली वेळ देखील परत येऊ शकत नाही.
जो गुरू असेल, तो शिष्य असेलच परंतु जो शिष्य नसेल, तो कधीच गुरूहोऊ शकत नाही.
जो व्यक्ती चांगल्या वॄक्षाचा आसरा घेतो त्याला चांगलीच सावली मिळते.
जो शिक्षक मुलांचे मन उत्तम पद्धतीने जाणतो, तोच खरा यशस्वी शिक्षक होऊ शकतो.
ज्या व्यक्तीकडे चांगल्या विचारांचा भक्कम असा पाया नाही ,त्याच्या आयुष्याची इमारत भक्कमपणे उभी राहूच शकत नाही.
ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्न करण्यामध्ये व्यस्त आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.
टीका आणि विरोध हीच तर नवीन काही करू पाहणार्यास मिळालेली बक्षिसे असतात.
तुमचे बोलणे आणि करणे यात भेद ठेवू नका.
तूच तर आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार.
थोर काय आणि सामान्य काय. गरज ही तर प्रत्येकाला प्रत्येकाची असतेच.
ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमात तर खरा आनंद लपलेला आहे .
प्रतिकूल परिस्तिथिनमध्ये जो अनुकूलता निर्माण करतो तोच खरा यशस्वी होतो.
जीवनात प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि तेव्हाच ती घडायलादेखील हवी, वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायलादेखील हवी.
प्रत्येक दिवस हा जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करायाला शिका.
जर जीवनात यशस्वी होयचे असेल तर प्रत्येकाच्या मनात एक तरी आदर्श व्यक्ती हि असलीच पाहिजे.
मानवाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक होय.
यश मिळवण्यासाठी लागणारी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय म्हणजेच मौन.
आकाशातील लखलखते तारे पाहायचे असतील तर आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
शिकणाऱ्याला व्यक्तीला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
आयुष्यातील अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
अपयशाने कधीच खचून जाऊ नका; अधिक जिद्दी व्हा.
आत्मविश्वास हे एक प्रभावी काजळ आहे, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग हा दिसतोच.
स्वतः ला जे आवडतं तेच करू नका. जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
व्यक्तीने एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कामाचे फळ म्हणजे यश होय.
कार्यात यश मिळो किंवा ना मिळो, प्रयत्न करण्यास संकोच करु नका.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर लखलखता प्रकाश देणारा सुर्य हा उगवतोच.
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. (ज्ञान )
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आपण अपयश पचविण्यास शिकले पाहिजे.
गुणांचं कौतुक थोडे उशिरा होईल पण होईल हे मात्र नक्की.
चुका करतो तो माणूस आणि झालेल्या चुका सुधारतो तो देवमाणूस.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा आणि आताच.
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करायला शिका, नाव आपोआप तयार होईल.
दुसऱ्याला सावली द्यायची असेल तर स्वतःला उन्हात उभं राहावं लागतं.
ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे हि होणारच.त्यामुळे लोकनिंदेकडे लक्ष्य देऊन भटकण्यापेक्षा ध्येया लक्ष दिलेले कधीही चांगले.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा कधीच होत नाही.
कष्ट इतक्या शांततेत करा कि तुमचे मिळणारे यश धिंगाणा घालेल.
यशाची ऊंची गाठताना कामाची लाज कधीही बाळगू नका.
आपले नशिब हे लिफ्ट आहे तर कष्ट हा जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते परंतु जिना मात्र तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर नेहमी वरच घेऊन जात असतो.
जेव्हा आपण मेहनत करतो तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटते, अन्यथा देव कोणालाही फुकट फळ देत नाही. प्रयत्नांती परमेश्वर.
काही मिळाले किंवा नाही मिळाले हे आपली हातात नाही, तो नशिबाचा खेळ आहे परंतु प्रयत्‍न इतके करा की परमेश्वराला देणे हे भागच पडेल.
जे तुमच्यासोबत घडले तो म्हणजे अनुभव नव्हे, तर जे घडले आणि त्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया केली तो म्हणजे अनुभव.
इतर लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता हे तुमचे कर्म.
माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे सुविचार होय.
ज्या लोकांकडे विचारांचा भक्कम असा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि जर कदाचित ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच याची शाश्वती ते लोक सुद्धा देऊ शकत नाहीत.
एखादे संकटं टाळता येणे शक्य नाही परंतु दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि हीच ताकत विचारांमध्ये असते.
दोष लपवला की तो मोठा होत जातो आणि कबूल केला की नाहीसाहोऊन जातो.
ज्या गोष्टी आपण कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
श्रीमंताचे बंगले चांगले असतात, म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये उत्कृष्ट कला आहे.
दुःख हे नेहमी गरूडाच्या पावलाने येतं असत आणि मुगींच्या पावलांनी जातं असत.
भव्य विचार हा सुगंधासारखा असतो, तो पसरवावा लागत नाही तो आपोआप पसरत जातो.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा, दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहणे चांगलेच.
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही कारण हे आपले अंतरंग खुले करते आणि कधीच चुकवत नाही की फसवत नाही.
जर तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात हे मान्य करावे लागेल.
लक्ष्यात ठेवा, जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे त्यामुळेच जर समुद्र गाठायचा असेल तर खड्डे हे पार करावेच लागतील.
संकटं टाळणं आपल्या हाती नसतं परंतु ह्याच संकटाचा खंबीरपणे सामना करणं हे आपल्या हातात असतं.
दु:ख सांगितल्याने कमी होते आणि सुख सांगितल्याने वाढते.
जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख हे कळणारच कसे ?
पाणी जेव्हा वाहतं तेव्हा त्याचा झरा होतो आणि पाणी हेच थांबत तेव्हा त्याच डबकं होत. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस.
क्रोधाच्या एका क्षणी संयम ठेवला तर होणाऱ्या पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
जो माणूस शहाणा असतो तो चुका विसरतो परंतु त्याची कारणे नाही.
गरूडाइतके चिमणीला उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
आपल्या दोषांवरील उपाय नेहमी आपल्याकडेच उपलब्ध असतात; फक्त ते शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो.
आपल्या आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एक म्हणजे आपण विचार न करता कृती करतो आणि दुसरे म्हणजे कृती करण्याऎवजी फक्त विचारच करत बसतो.
जो पोपट त्याच्या शहाणपणाचे प्रदर्शन करतो तो पोपट कायमचा बंदिवान होतो.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो आपण केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी-कमीच होत जातो.
आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.
पाण्यापेक्षा आपल्याला तहान किती आहे याला जास्त महत्व असते.
मृत्यू पेक्षा श्वासाला सर्वात जास्त किंमत असते.
जे चांगले असतील ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देऊन जातील.
पैसा हा एखाद्या खतासारखा आहे. तो साठवला, कि कुजतो आणि गुंतवला तर वाढत जातो.
स्वतःची तुलना कधीही इतरांसोबत करू नका तसे केल्यास तुम्ही तुमचा अपमान करता आहात हे लक्ष्यात ठेवा.

This article is all about Suvichar In Marathi (Good Thoughts In Marathi). This article covers almost all Suvichar In Marathi(Good Thoughts In Marathi). You can get 100+ Suvichar In Marathi(Good Thoughts In Marathi).

Read More
Categories