Raksha Bandhan Wishes In Marathi
Raksha Bandhan Wishes In Marathi: भाऊ बहिणींमधील प्रेमाचे बंधन साजरे करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. भावंडे मिठाई आणि भेटवस्तूंची देवाण घेवाण करतात त्यामुळे हा सण खूपच उत्साहाने भरलेला असतो. रक्षाबंधन हा भारतीय सनांपैकी एक लोकप्रिय सण आहे. रक्षाबंधन हा दिवस भाऊ बहिणींमधील अविश्वसनीय बंधन साजरा करणारा मानला जातो.
आम्ही या लेखामध्ये गोड, सुंदर अशा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Raksha Bandhan Wishes In Marathi) चा संग्रह दिला आहे. जर आपण या दिवशी आपल्या भाऊ किंवा बहिणी पासून दूर असाल तर आपण हे संदेश पाठवून त्यांना रक्षाबंधनाची सुंदर भेट देऊ शकता. तसेच Raksha Bandhan in Marathi या लेखामधील तुम्हाला आवडलेला संदेश तुम्ही तुमच्या भावंडांना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्वीटर वर शेअर करू शकता.
या दिवशी सर्व भाऊ आपले खिसे मोकळे करण्यास तयार असतात आणि आपल्या प्रेमळ बहिणीचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असतात. म्हणून या रक्षाबंधनाला जेव्हा तुम्ही भावाला राखी बांधाल किंवा पाठवाल तेव्हा तो तुमच्यासाठी किती खास आहे याची आठवण करून देताना तुमच्या प्रेमा सह काही गोड संदेश त्यांना पाठवायला विसरू नका.
जो पर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी तुझे रक्षण करतच राहणार. माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. रक्षाबंधनाच्या या शुभ दिवशी तू माझ्या हातात राखी बांधून माझ्या आरोग्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतेस. ताई तुझे खूप खूप आभार आपले नाते दिवसेंदिवस असेच मजबूत होत राहो.लव्ह यू ताई.
तुझ्या सारखा काळजी घेणारा आणि प्रेमळ भाऊ मिळाला याचा मला खूप अभिमान आहे नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल धन्यवाद.
या रक्षाबंधनाला मी तुला वचन देते की मी तुला त्रास देणे कधीच सोडणार नाही परंतु जेव्हा कठीण परिस्थिती मध्ये तुला माझी गरज भासेल तेव्हा मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी राहीन.
कच्या धाग्यापासून बनवलेला एक मजबूत धागा म्हणजे राखी. राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड आठवणींचा क्षण. राखी म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना. बहिणीचा प्रेमाचा पवित्र सण म्हणजे राखी. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिण म्हणजे बालपणातील सर्व सुंदर आठवणींचे प्रतिबिंब असते. हॅप्पी रक्षाबंधन टू माय स्वीट सिस्टर.
रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी ईश्वराकडे हीच प्रार्थना करते की माझ्या सुंदर भावाला दीर्घायुष्य, आनंदी, सकारात्मकता, शांती आणि सुस्वास्थ्य जीवन मिळो. माझ्या प्रेमळ भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे आयुष्य तू खूप सुंदर बनवले आहेस मी तुला प्रत्येक वाईट संकटातून वाचवण्याचे वचन देतो आणि नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन. लव्ह यू सिस्टर.
आपल्यामधील प्रेमाचे नाते कायमचे आहे. माझ्या प्रिय बहिणीप्रमाणे मला कोणीही समजून घेऊ शकत नाही. माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि बहीण झाल्याबद्दल धन्यवाद. आईप्रमाणे माझी काळजी घेतल्याबद्दल आणि माझ्या वर सर्वात जास्त प्रेम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस. तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस. लव्ह यू दादा. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
माझ्या परी सारख्या बहिनीला ईश्वर भरभरून आनंद, आरोग्य आणि संपत्ती देवो. हॅप्पी रक्षाबंधन माय स्वीट एंजल.
या संपूर्ण जगातील तू एकमेव व्यक्ती आहेस ज्याच्याशी मी माझ्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी शेअर करताना विचार करत नाही. मला देवाकडून एक उत्तम भाऊ भेट म्हणून मिळाला आहे जो माझ्या आयुष्यात भाऊ आणि मित्र या दोन भूमिका बजावतो तू सोबत असताना मला कधीच मित्राची गरज वाटली नाही.रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
ताई तू काळजी करू नकोस या वर्षी आपण हा सण एकत्र साजरा करत नसलो म्हणून काय झाले तू बांधलेली गेल्यावर्षीची राखी अजूनही माझ्या हातातच आहे.
तुझ्यासारखा प्रेमळ, दयाळू, काळजी घेणारा आणि गोड भाऊ मला मिळाल्याचा खूप आनंद आहे. तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहेस मी माझ्या भेटवस्तू ची वाट पाहत आहे आणि जर तू ती दिली नाहीस तर तुझ्यावर मोठे संकट येऊ शकते.
ताई तू माझी किती काळजी करतेस, मी काहीही न बोलता तू माझ्या मनातले कसे ओळखतेस.ताई तुला मनापासून धन्यवाद.लव्ह यू ताई.
बहिण ही अशी व्यक्ती आहे जी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते आणि काळजी घेते. आपले विचार आणि भावना समजून घेऊन प्रत्येक कठीण परिस्थितीत मदत करते ती बहीण असते अशा माझ्या प्रिय बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझे सर्व रहस्य लपवल्या बद्दल आणि मला जे हवे आहे ते करण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल धन्यवाद. लव्ह यू ब्रदर.
आपण कितीही मोठे झालो तरी मी तुला त्रास देणे सोडणार नाही आणि तुझ्या हातावर बांधलेल्या राखी ची गाठ कधीच सुटू देणार नाही रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
अरे दादा, तू यावर्षी तरी सुधारणार आहेस का या रक्षाबंधनाला तरी मला गिफ्ट आणणार आहेस का?
माय डियर सिस्टर, तुझ्या रुपात देवाने माझ्या आयुष्यात एक सुंदर परी पाठवली आहे. तू नेहमी चांगल्या आणि वाईट काळात माझी मदत करण्यास आणि पाठिंबा देण्यास तयार असतेस.
दादा तू कितीही चिडलास तरीही मला माहित आहे तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे. आता ये ना लवकर मी माझ्या गिफ्ट ची वाट पाहतेय. लव्ह यू दादा.
मी खूप भाग्यवान आहे कारण माझी बहीण दरवर्षी माझ्या मनगटावर राखी बांधून माझ्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते अशी गोड बहीण मला माझ्या आयुष्यात मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे.
भाऊ हे रस्त्यावरील दिव्याप्रमाणे असतात ते कदाचित आपल्या प्रवासातील अंतर कमी करू शकत नाहीत परंतु ते आपला प्रवासच सुलभ करतात आणि आपल्या जीवनाला परिपूर्ण बनवतात.
आपण या रक्षाबंधनाला एकत्र नाही पण म्हणून माझे तुझ्यावरील प्रेम बदलले नाही मी नेहमी तुझी काळजी घेईन आणि तुझे रक्षण करीन असे वचन देतो. हॅप्पी रक्षाबंधन सिस्टर.
जर प्रेम चंद्रासारखे असेल तर भाऊ ताऱ्या प्रमाणे असतात आणि मी असे पाहिले आहे की चंद्रा शिवाय आकाश चांगले दिसते परंतु ताऱ्या शिवाय नाही. हॅप्पी रक्षाबंधन.
तुझ्या मनगटावर राखी बांधण्यासाठी या वर्षी कदाचित मी तेथे नसेन परंतु मला माहित आहे मी नेहमी तुझ्या हृदयात आहे.
ताई आत्तापर्यंत तू बांधलेली प्रत्येक राखी आणि त्यातील तुझे प्रेम मी आजही खूप जपून ठेवलेले आहे आणि नेहमीच माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन.खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी असूच शकत नाही आणि ताई तुझ्या पेक्षा चांगली बहीणया जगात नाही. माझ्या गोड ताईला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू नेहमीच माझ्याशी भांडण करतेस आणि म्हणतेस की मी तुझ्यावर प्रेम करत नाही तुला नेहमी त्रास देतो पण छोटी राखीच्या या शुभ प्रसंगी मला तुला एवढेच सांगायचे आहे की मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो. पण ऐक याचा अर्थ असा नाही कि मी तुला त्रास देणे थांबवेन. हॅप्पी राखी सिस्टर.
भाऊ मला तुझी खूप आठवण येते आहे प्लीज तू लवकर ये मी खूप उत्सुकतेने तुझी वाट पाहतेय. हॅप्पी रक्षाबंधन. तुझी लहान बहीण.
ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांच्या कडे काळजी करणारी बहीण असते. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.
डिअर ब्रदर, या रक्षाबंधनाला मला तुला सांगायचे आहे की तू एक उत्तम भाऊ आहेस आणि माझ्यासाठी तु माझे जग आहेस. हॅप्पी रक्षाबंधन ब्रदर.
दादा तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास, तुझ्या प्रेरणादायक शब्दांनी नेहमी मला प्रेरित केले आणि माझ्या अपयशावर विजय मिळवण्यास मला मदत केली दादा तू जे काही माझ्यासाठी केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊ बहीण जरी कुत्रा मांजरा प्रमाणे भांडले तरीही ते सर्वात चांगले मित्र असतात आणि गरजेच्या वेळी नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.
बहिणी आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि आपले अश्रू पुसण्यासाठी असतात. लव्ह यू माय स्वीट सिस्टर.
आपण काही अंतर दूर असू शकतो परंतु मी नेहमीच तुझा आदर करते आणि तुझ्यावर खूप प्रेम करते. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी मी माझे प्रेम आणि शुभेच्छां सोबत राखी पाठवत आहे.
रक्षाबंधन हा दिवस म्हणजे ईश्वराकडून मिळालेली भेट आहे ज्याच्या द्वारे आपण आपले प्रेम व्यक्त करू शकतो नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल, मला हसवल्याबद्दल आणि मला प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद ताई तू नेहमी आनंदित रहा एवढीच माझी इच्छा आहे.
ताई तुला या जगातील सर्व आनंद देईन तुझा भाऊ असण्याचे प्रत्येक कर्तव्य मी पार पाडीन.माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या सर्व चुकीची शिक्षा मी भोगली आहे तुझ्या वरचा सर्व मारही मीच खाल्ला आहे कारण छोटी तुझे रक्षण करण्याचे वचन मी तुला दिले आहे.
आपले नाते हे आपल्या जन्मापासूनचे आहे आणि ते विश्वासाने आणि प्रेमाने भरलेले आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझा भाऊ माझ्यापासून खूप दूर आहे जिथे मी त्याला पाहू शकत नाही त्याच्यासोबत हसू शकत नाही,त्याचा हात धरू शकत नाही परंतु तो नेहमीच माझ्या विचारात आणि मनात राहील.
जेव्हा तू माझ्या मनगटावर राखी बांधतेस तेव्हा आपण एकत्र घालवलेल्या सुंदर आठवणींची तू मला आठवण करून देतेस. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याशी खूप भांडून शेवटी वेळ आल्यावर आपलीच बाजू घेणारी फक्त बहिण असते. अशा गोड बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
डिअर सिस्टर, तू या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस मी खूपच भाग्यवान आहे कारण तू माझ्या सोबत आहेस तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
जसजसा रक्षाबंधन जवळ येत आहे तेव्हा तुम्हालाही तुमच्या बहीण किंवा भावाला काय गिफ्ट द्यायचे याचे टेन्शन आलेच असेल. बहिण भाऊ कितीही भांडत असले तरीही ते एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रिणी असतात. त्यामुळे रक्षाबंधनाला एकमेकांना भेटवस्तू देऊन त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची ही उत्तम वेळ आहे. तुम्ही बांधलेली राखी नेहमीच त्यांच्यासोबत नसेल पण तुम्ही दिलेल्या भेटवस्तूमुळे नेहमीच तुमची आठवण काढली जाईल.
आजच्या या जगात भाऊ बहिणीला भेट देतातच परंतु भेटवस्तू दोन्ही बाजूंनी दिल्या पाहिजेत कारण बहिण भावाचे एकमेकांवर समान प्रेम असते.
खाली दिलेल्या काही भेटवस्तू ह्या बहीण आणि भाऊ दोघांनाही देता येऊ शकतात. तर आपण या रक्षाबंधनाला आपल्या बहीण किंवा भावाला भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणीत करू शकता.
बहिणीसाठी भेटवस्तू:
चॉकलेट: आपल्याला माहीतच आहे की मुलींना चॉकलेट किती आवडतात. तर तुमच्या बहिणीला या रक्षाबंधनाला खूष करण्यासाठी तुमच्याकडे एक बेस्ट पर्याय असू शकतो. आणि जर तुमची बहीण डायट वर असेल तर हा चॉकलेट बॉक्स तुम्हालाच मिळणार आहे.
दागिना: जेव्हा तुमची बहिण तुमच्या हातात राखी बांधेल तेव्हा तिच्या हातात एक छानसे ब्रेसलेट किंवा अंगठी घाला. तुमची बहिणीला हे गिफ्ट बघून खूपच आनंद होईल आणि तसेच तुमची तिच्याबद्दलची काळजी दर्शवण्याचा हा एक गोड मार्ग आहे.
स्पीकर :जर तुमच्या बहिणीला संगीताची आवड असेल तर हे गिफ्ट तिच्यासाठी योग्य आहे. आपण कदाचित तिच्या संगीताचा द्वेष करीत असाल तरीही तिच्या आनंदासाठी तुम्ही तिला हे गिफ्ट नक्कीच देऊ शकता.
मेकअप बॉक्स: सर्वच भाऊ आपल्या बहिणीला बालपणापासूनच तिच्या रूपाबद्दल चिडवत असतात परंतु सर्वच भावांना माहित असते की आपली बहीण खूप सुंदर आहे. तर या रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला मेकअप बॉक्स देऊन तिचा आनंद द्विगुणीत करा.
भावासाठी भेटवस्तू
घड्याळ: एखादे सुंदर घड्याळ तुम्ही या रक्षाबंधनाला तुमच्या भावाला भेट म्हणून देऊ शकता. त्यामुळे वेळ पाहताना भावाला तुमची आठवण नक्कीच होईल.
व्हिडिओ गेम: जर तुमचा भाऊ लहान असेल तर त्याला ही भेटवस्तू नक्की आवडेल.
हेडफोन्स: जर तुमच्या भावाला गाण्याची आवड असेल तर तुम्ही हेडफोन्स गिफ्ट म्हणून भावाला देऊ शकता.
या लेखा मध्ये आम्ही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा चा संग्रह दिलेला आहे. त्यासोबतच बहीण किंवा भावाला दिल्या जाणाऱ्या काही भेटवस्तूंची नावे दिलेली आहेत. जर तुम्हाला rakhi messages in Marathi हा लेख आवडला तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
This article is all about Raksha Bandhan In Marathi, raksha bandhan sandesh marathi, Rakhi Messages In Marathi, brother and sister relationship sms in marathi. You can easily copy and share these wishes with your brother and sister, also you can download these images and share with your brother and sister.