दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. दसरा हिंदू धर्मातील एक प्रमुख उत्सव आहे. अश्विन शुद्ध दशमी म्हणून देखील विजयादशमी हा सण ओळखला जातो. दसऱ्याचा हा सण रामाने रावणावर मिळवलेला विजय तसेच महिषासूरावर देवी दुर्गाचा विजय दर्शवितो. भगवान रामचंद्र सत्याचे तर रावण अधर्माचे प्रतिनिधित्व करतो.
महाराष्ट्रात दसरा हा सण मोठ्या उत्सवाने साजरा करतात. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्र उत्सव साजरा करतात आणि नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा केल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते.
विजयादशमीच्या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व असते. ही आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला जातो. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये आपट्याची पाने वाटून वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतला जातो.
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन खरेदी केली जाते. या दिवशी घर, गाडी, सोने- चांदी आदी गोष्टींची खरेदी केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी विद्येची देवता सरस्वतीचे पूजन केले जाते तसेच शास्र पूजा देखील केली जाते.
या लेखामध्ये Dasryachya Hardik Shubhechha In Marathi with Image दिलेल्या आहेत. या Vijayadasami Chya Hardik Shubhechha Images तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र परिवाराला व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर वर नक्की शेअर करा.
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला विजय मिळो तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
विजयादशमीचा सण हा मोठा, आयुष्यात तुमच्या कधी नसो आनंदाला तोटा.
रांगोळी घालूनीया अंगणी फुलांची तोरणे बांधूनी दारी करूनिया सोन्याची उधळणं नाती जपुया आपल्यातली. विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा.
सोनेरी पहाट,सोन्याच्या दिवस, सोन्याची उधळण होवो सोन्यासारख्या लोकांवर. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची प्रथा आहे पण एवढा श्रीमंत मी नाही परंतु माझ्या नशिबाने मला सोन्यासारखी माणसे नक्की मिळाली आहेत. सोन्यासारख्या माणसांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोन घ्या सोन्यासारख व्हा.
दसऱ्याचा हा शुभमुहूर्त तुमच्या व तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती भरो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
शांतिप्रिय या देशामध्ये वाईट गोष्टींचा नाश व्हायला हवा आतंकी रावणाचे दहन करण्यास आज रामाला पुन्हा यायला हवे.
दसऱ्याच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व चिंता, दुःख रावणासोबत जळून जावो, तुमच्या व तुमच्या कुटुंबाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
विजयादशमीच्या या शुभ क्षणी तुमच्या व तुमच्या परिवाराच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती वाढो. हॅप्पी दसरा.
भीती नसे आम्हा पराजयाची, आमच्या मना विजयाचे वेड लावूनी, दसऱ्याचे सोने लुटुनी, रोवितो मुहूर्तमेढ आनंदाची . विजयादशमीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
रावण रुपी पुतळ्या सोबत वाईट विचारांचेही दहन करुयात. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या हृदयात श्रीरामांचे विचार असणे गरजेचे आहे मित्रांनो, पुतळ्याचे दहन करून रावण कधी मरत नाही.
वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनात भरभरून आनंद येवो हीच दसऱ्याच्या दिवशी राम चरणी प्रार्थना. विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
आपट्याची पाने झेंडूचा हार दसऱ्याचा हा दिवस आहे खूपच खास. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.
आंब्याची तोरणे लावूनी दारी, येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
रावणाचा सर्वनाश होवो, श्रीराम सर्वांच्या अंत:करणात राहो, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणसातील रावणरुपी अहंकाराचा नाश करूयात आजचा दसरा आनंदाने साजरा करूयात.
या आहेत Dasryachya Hardik Shubhechha.दसऱ्याच्या शुभ दिनी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या प्रेमासह ह्या Dasryachya Hardik Shubhechha Images पाठवायला विसरू नका. तसेच आपणास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आवडले असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना तसेच परिवारातील इतर सदस्यांना नक्की शेअर करा. तसेच तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा (Vijayadasami Chya Hardik Shubhechha In Marathi) हा लेख आवडला असेल किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा.