या लेखात आम्ही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा (Diwali Message In Marathi) दिलेल्या आहेत. तुम्हाला आवडलेल्या शुभेच्छा ( Diwali Shubhechha In Marathi ) तुम्ही कॉपी करून तुमच्या परिवाराला तसेच मित्र मैत्रिणींना व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर तसेच इंस्टाग्रामवर नक्की शेअर करा.
तसेच तुम्हाला Diwali Quotes In Marathi ह्या शुभेच्छा आवडल्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच प्रत्येक दिवाळी संदेश (Diwali Quotes In Marathi) च्या खाली कॉपी नावाचे बटन दिले आहे, तुम्ही आवडलेला संदेश कॉपी करून तुमच्या कुटुंबियांना तसेच मित्रांना दिवाळीच्या दिवशी पाठवू शकता.
देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आनंद, सुख, शांती आणि समाधान लाभो लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
दिव्यांचा प्रकाश तुमच्या आयुष्यात एक नवी सोनेरी पहाट घेऊन येवो हीच शुभेच्छा या दीपावलीच्या दिवशी.
लखलखत्या दिव्यांचा प्रकाश तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, उटण्याची अंघोळ, रांगोळीची आरास, गोड फराळ असा दिवाळीचा सण प्रत्येकासाठीच आहे खास. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
मित्रा जर तू मला मेसेज नाही केलास तर काही दिवसांनी तुझ्या घरात बॉम्ब फुटेल.. अरे घाबरू नकोस काही दिवसातच दिवाळी येत आहे. ऍडव्हान्स मध्ये हॅप्पी दिवाळी.
कुंकवाच्या पावलांनी येवो लक्ष्मी तुमच्या घरात, सुख संपत्ती मिळो तुम्हा अपार. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
फुलांचे तोरण बांधूनिया दारी,आकाशकंदील लवूनिया अंगणी, सप्तरंगी रांगोळीची घालुनी आरास, साजरी करू दिवाळी आनंदात. दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला ही दिवाळी आनंददायी आणि प्रकाशमय बनवूया, खऱ्या अर्थाने प्रकाशोत्सव साजरा करूया. दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
या दिवाळीला भरभरून आनंद व्यक्त करा, आपल्या लोकांसोबत आनंदाचे क्षण घालवा दीपावलीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.
ईश्वराचे खूप खूप आभार कारण त्यांनी मला खूप सुंदर कुटुंब दिले आहे आणि त्यांनी माझी प्रत्येक दिवाळी खूप खास बनवली आहे.
रांगोळीच्या सप्तरंगाप्रमाणे तुमचे आयुष्य आनंदी होवो, दिव्याच्या प्रकाशाने तुमच्या यशाचा मार्ग उजळून जावो, श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य सुखकर होवो दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
या दिवाळीला हसत खेळत दिवे लावू, सर्व दुःख, भांडणे विसरून आनंदाने ही दिवाळी साजरी करू.दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या तेजस्वी प्रकाशाने आपले व आपल्या प्रियजनांचे जीवन उज्वल आणि आनंदी होवो. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
इतरांचे जग प्रकाशमय करून खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा करूयात, आपणास सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्याकडून माझ्या संपूर्ण मित्र परिवाराला दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
दिवाळी हा सण पराभवावर विजय, अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञानाने केलेला विजय साजरा करणारा प्रसंग. या शुभप्रसंगी तुमचे जीवन आनंदाने शांततेने उजळून जावो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्यासारख्या प्रेमळ लोकांच्या शुभेच्छांसह दीपावलीचा हा आनंदमय उत्सव अपूर्ण आहे दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यात सुख,शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो. हॅप्पी दिवाळी.
दिवाळीचा सण आपल्याला जीवनातील सर्व अडचणी अडथळ्यांची लढण्याची नवीन प्रेरणा देतो.दीपावलीच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.
दिवाळी म्हणजे काळया रात्रीवर उजेडाने मिळवलेला विजय. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
फुलांची सुरुवात कळी पासून होते.आयुष्याची सुरुवात प्रेमाने होते. प्रेमाची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आपल्या माणसांची सुरुवात तुमच्यापासून होते. हॅप्पी दिवाळी.
दिवाळीच्या शुभ दिनी तुम्हाला यश आणि समृद्धी लाभो. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
दिवाळीच्या या शुभ प्रसंगी मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशाने तुझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल आणि तू माणसात येशील. हॅप्पी दिवाळी.
जीवनाचा आनंद घेण्यासाठी मेणबत्या, आयुष्य सजवण्यासाठी प्रकाश, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी फटाके, यशाची गोडी वाढवण्यासाठी मिठाई, ईश्वराचे आभार मानण्यासाठी पूजा. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
फटाके न लावता सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करूयात. हॅप्पी दीपावली.
लक्ष लक्ष दिव्यांनी तुमची सर्व स्वप्न उजळून जावो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो, दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
हि दिवाळी तुम्हाला भरभराटीची आणि आनंदाची जावो तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही चंद्रासारखे चमकत रहा. शुभ दिपावली.
दीपावलीच्या या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात सुख समाधान भरभरून येवो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला चैतन्यदायी, प्रकाशमय, मंगलमय शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी.
प्रेमाच्या पावसाने तुमचे घर अंगण उजळून जावो. तुम्हाला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
दीपावलीच्या या शुभ प्रसंगी देवाकडे एवढीच इच्छा आहे आपणास नेहमी आनंदी, सुरक्षित, दीर्घायुषी जीवन लाभो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास तुम्हाला ईश्र्वरची मदत मिळो.
शंका अंधारा सारखी असते तर विश्वास प्रकाशा सारखा असतो आणि या प्रकाशाला कोणताही अंधार नष्ट करू शकत नाही. चला हि दिवाळी आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरी करूयात.
शेवटी तो दिवस आलाच जेव्हा आपण रात्रभर वेड्यासारखी मस्ती करून प्रत्येकाची झोपमोड करूनही कोणीच आपल्याला काहीच बोलत नाही. खरंच दिवाळी सण खूप ग्रेट आहे.
दीपावलीचा सण आपल्याला वाईटाविरुद्ध लढण्याचे आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालण्यास शिकवतो. दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
या दिपावलीत आपल्या सर्व प्रियजनांचे आभार मानूयात. आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र आणि ईश्वराची आपल्यावर असणारी कृपा.. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी म्हणजेच दिव्यांचा उत्सव हा सण महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्वात मोठा उत्सव आहे. दिवाळी सण संपूर्ण देशभर थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी हा सण प्रत्येकासाठी आनंद देणारा असतो मग ते लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती असो.
रावणाला पराभूत करुन श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येत आपल्या राज्यात परत आले. लोक आजही तो दिवस उत्साहाने साजरा करतात. श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून आल्यानंतर अयोध्येतल्या लोकांनी मोठ्या उत्साहात आपल्या परमेश्वराच्या स्वागतासाठी घरे आणि मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने प्रज्वलित केले होते. दिवाळी हा एक पवित्र हिंदू सण आहे जो असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
दिवाळी सणामध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व असते. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी दिवाळी सणामध्ये सर्वजण आपले घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ करतात. घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात. आंब्याच्या पानांचे तसेच झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावले जाते अंगणामध्ये रांगोळी काढून देवी लक्ष्मीचे तसेच पाहुण्यांचे स्वागत केले जाते.
दिवाळी सणामध्ये धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे पाच मुख्य उत्सव असतात