❤ Marathi Ukhane For Female | Bride | नवरी साठी मराठी उखाणे - LifelineMarathi

Ukhane For Female In Marathi: Ukhane किंवा नाव घेणे ही परंपरा आजही महाराष्ट्रीयन लग्नामध्ये सुरु आहे. महाराष्ट्रीयन लग्न म्हण्टलं कि इतर तयारी प्रमाणेच Marathi Ukhane ची ही तयारी केली जाते. जर तुमचे लग्न काही दिवसावरच आले असेल आणि तुम्ही Marathi Ukhane For Female च्या शोधात असाल तर तुम्हाला आमची Marathi Ukhane List हा लेख नक्की आवडेल.

लग्नात पतीचे नाव उखाण्यात घेण्याची पद्धत पूर्वपरंपरागत चालत आली आहे. मराठी संस्कृती मध्ये प्रत्येक सण समारंभामध्ये जसे Makar Sankranti Ukhane किंवा Dohale Jevan Ukhane, Mangalagaur Ukhane घेण्याची प्रथा आहे आणि जर नवरी लग्नामध्ये (Marathi Lagna Ukhane) उखाणे घेत असेल तर त्याची मजाच वेगळी असते.

marathi ukhane for female

Table Of Content:


ज्यांच्यासाठी आपण उखाणा शोधात आहेत त्यांचे नाव इथे लिहा आणि 'Generate' या बटनावर क्लिक करा, म्हणजे खालील सर्व उखाणे तुम्हाला त्या नावाने मिळतील.

:

Ukhane in Marathi for Female Marriage (गृहप्रवेश उखाणे)

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल ___ रावांच्या आयुष्यात टाकते मी पाहिले पाऊल.
यमुना काठी वाजवतो कृष्ण बासरी ___ रावांसोबत आले मी सासरी.
उंबऱ्यावरचे माप पदस्पर्शाने लवंडते ___ रावांसोबत गृहप्रवेश मी करते.
देवापुढे काढली रांगोळी फुला फुलांची ___ रावांचे नाव घेते सून मी ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची.
पंक्तीमध्ये पंचपक्वानाचे ताट, ताटात भात,भातावर वरण, वरणावर साजूक तूप, तुपासारखे मिळाले रूप, रूपासारखा आमचा जोडा, ___ रावांचे नाव घेते आतातरी माझी वाट सोडा.
माहेरच्या निरांजनात लावते सासरची फुलवात ___ रावांचे नाव घेऊन करते नवीन आयुष्याची सुरुवात.
आई वडिलांनी वाढविले, शिक्षकांनी घडवले ___ रावांचे नाव घ्यायला ( दारात अडवलेल्यांचे नाव ) नी दरात अडवले.
अवकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा, विष्णु आणि महेश ___ रावांचे नाव घेऊन करते मी ग्रुहप्रवेश.
भरजरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज ___ रावांच नाव घेऊन गृहप्रवेश करते आज.
रातराणीचा पसरतो सर्वत्र सुवास ___ रावांसोबत सुरू केला जीवनाचा प्रवास.
सासरे माझे प्रेमळ, सासूबाई आहेत हौशी ___ रावांचे नाव घेते गृह प्रवेशाच्या दिवशी.
शिऱ्यात घालतात काजूचे काप ___ रावांसोबत ओलांडते मी माप.
नमस्कारासाठी सर्वांपुढे जोडले दोन्ही हात ___ रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट.

स्मार्ट उखाणे (Smart Ukhane)

पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार ___ रावांच नाव घेते करून शिवरायांना नमस्कार.
कपाळी लावत होते कुंकू, कुंकवात पडला मोती ___ राव मिळाले पती, ईश्र्वराचे आभार मानू किती.
यमुना नदीत पडते ताजमहलाची सावली ___ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
पूजेच्या ताटात उदबत्तीचा पुडा ___ रावांच्या नावाने भरला मी हिरवा चुडा.
रायगडावर घेतले शिवरायांचे दर्शन ___ रावांच्या प्रेमासाठी केले जीवन अर्पण.
इंद्रधनुष्य पडते जेव्हा पावसात असते ऊन ___ रावांच नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) ची सून.
होते कन्या माहेरी आता सून झाले सासरी ___ रावांसारखे पती लाभले भाग्यवान मी खरी.
मनातले नाव उखाण्यात घेताना शब्द जुळवत राहिले ___ रावांनी मला मात्र गोड बोलून फसवले.
नवस केला सावित्रीने मिळाला पती सत्यवान ___ राव मिळाले पती आहे मी भाग्यवान.
गळ्यातले मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराची सून.
शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात ___ रावांची आणि माझी साता जन्माची साथ.
हिमालय पर्वतावर आहेत बर्फाच्या राशी ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) च्या दिवशी.
निळ्या निळ्या आभाळात सूर्याचा प्रकाश ___ रावांवर आहे मला पूर्ण विश्वास.
आईने केली माया बाबांमुळे बनले सक्षम ___ रावांसोबत होईल माझा संसार भक्कम.
संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी ___ रावांमुळेच आली माझ्या जीवनात गोडी.
भरजरी शालूवर शोभते मोरांची जोडी ___ रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी.
गणपती समोर ठेवले लाडू- पेढे ___ रावांचे नाव घ्यायला कशाला एवढे आढे वेढे.
नाही नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाचे ___ रावांमुळे मिळाले मला सुख सौभाग्याचे.
मोगऱ्याचे झाड फुला फुलांनी दाटले ___ चे नाव घेताना आनंदी मला वाटले.
निळ्या आभाळाच्या तबकात आहे नक्षत्रांचा हार ___ रावांचे विचार आहेत खूपच उधार.
झाडावर बसलाय पक्षांचा थवा ___ रावांचे नाव घ्यायला उखाणाच कशाला हवा.
___ रावांची आणि माझी स्वर्गात जमली जोडी सर्वांनी आशीर्वाद देवून वाढवावी लग्नाची गोडी.
घराभोवती अंगण, अंगणात तुळस ___ रावांच्या आयुष्यात चाढवीन मी सुखाचा कळस.
काचेच्या वाटीत फळे ठेवली कापून ___ रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
आकाशात शोभून दिसे चंद्राची कोर ___ रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर.
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी ___ रावांची मी आहे अर्धांगिनी.
श्रावण महिन्यात करतात श्रावणी सोमवार ___ राव आहेत खूपच दिलदार.
शंकराची करते आराधना देवीची करते उपासना ___ राव नेहमी सुखी राहावेत हिच माझी प्रार्थना.
भगवद गीतेतून मिळतो जीवन जगण्याचा अर्थ ___ रावांशिवाय माझे आयुष्य आहे व्यर्थ.
नव्या घरी जपली जाते मराठमोळी संस्कृती ___ रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती.
नात्यात आणि मैत्रीत नसावा स्वार्थ ___ रावांमुळे मिळाला जीवनाला खरा अर्थ.
सोन्याची अंगठी आहे प्रेमाची खून ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची सून.
दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी ___ रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.
अंगणात काढते रांगोळी फुलांची ___ रावांचे नाव घेते नवी सून ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची.
नेत्रांच्या निरांजनात अश्रुंच्या वाती ___ रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.
मैत्रिणी सारखी नणंद माझी, भावासारखा आहे दीर ___ रावांचे नाव घ्यायला मन माझे नेहमीच अधीर.
देवीच्या मंदिराला सोन्याच्या कळस ___ राव आहेत सर्वांपेक्षा सरस.
कवीची कविता मनापासून वाचावी ___ रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.
आयुष्याच्या सागरात ( मुलाकडील आडनाव ) ची नौका ___ रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका.
तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून ___ रावांच नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची सून.
आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा ___ रावांच्या पाठीशी ईश्र्वराचा हात सदैव असावा.
गुलाबाचे फूल लावते वेणीला ___ रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.
हिऱ्याची अंगठी, चांदीचे पैंजण ___ रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण.
संसार रुपी सारिपाठावर पडले मनाजोगे दान ___ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.
मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे मनी ___ राव माझ्या सौभाग्याचे धनी.
पित्याचे कर्तव्य संपले, झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात ___ रावांची सोबत लाभो माझ्या भावी जीवनात.
आई वडिलांचा निरोप घेताना पाऊले होतात कष्टी ___ रावांच्या आयुष्यात करेन सुखाची वृष्टी.
घराला आहेअंगण, अंगणात आहे तुळशी वृंदावन ___ रावांच्या संसाराचे करेन मी नंदनवन.
यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवतो बासरी ___ रावांसोबत सुखी राहीन मी सासरी.
लाल कुंकू कपाळावरी, हिरवा चुडा हाती ___ राव माझे पती सांगा तरी माझे भाग्य किती.
जगात नाही एकलव्य सारखा शिष्य ___ रावांना मिळो शंभर वर्षे आयुष्य.
कण्व ऋषींच्या आश्रमात आहे शकुंतले चे माहेर ___ रावांनी दिला मला सौभाग्याचं आहेर.
निळ्या निळ्या अवकाशात होते ढगांची दाटी ___ रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी.
आकाशात चांदणे शिंपीत रात्र आली ___ राव मला मिळाले आणि माझी तपस्या पूर्ण झाली.
तिळा सारखा स्नेह गुळासारखी गोडी, देवा सुखी ठेव माझी आणि ___ रावांची जोडी.
गणपतीच्या शिरावर हिरामानिकाचे छत्र ___ रावांच्या नावाचे घालते मंगळसूत्र.
तुळशीचे वृंदावन आहे पावित्र्याचे स्थान ___ रावांनी दिला मला सुवासिनीचा मान.
सुरुवात करते दिवसाची जोडून सूर्य नारायणाला हात ___ रावांची लाभो जन्मो जन्मीची साथ.
पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा ___ राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा.
मंगळागौरी मंगळ माते नमन करते तुला ___ रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
हातावर चढला रंग मेहंदीचा पक्का ___ रावांच नाव घेते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका.
फुलांची वेणी गुंफते माळी ___ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी.
नको माणिक मोती, नको चंद्र हार ___ रावांच नाव हाच खरा अलंकार.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान ___ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.
चाफयाचे फुल दिसायला ताजे ___ च नाव घेते सौभाग्य माझे.
चंद्र, तारे अवकाशाचे सोबती ___ राव माझे जन्मोजन्मीचे साथी.
आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे ___ राव माझे अलंकार खरे.
सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवनाचे वस्त्र विणले ___ रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
आषाढ सरून आला श्रावण महिना ___ रावांचे नाव घेतल्या शिवाय मला बाई राहवेना.
पूजेच्या साहित्यात पानाचा विडा ___ रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा.
समुद्राला आली भरती नदीला आला पुर ___ रावांसाठी माहेर केले दूर.
चांदीचे जोडवे सौभाग्याची खुन ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) ची सून.
गणपतीच्या पूजेला आणले जास्वंदी चे हार ___ रावांमुळे आयुष्याला मिळाली सुखाची किनार.
तुमच्या आग्रहाखातर उखाणा मी आठवते ___ रावांचे नाव घेताना मीच मोहरते.
कळी हसेल फुल उमलेल दरवळेल धुंद सुगंध ___ च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
वटपौर्णमेची पूजा मनोभावे करते ___ रावांसाठी दीर्घायुष्य मागते.
संगमरवरी गाभारा त्याला सोन्याच्या कळस ___ रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.
गुलाबाचा सुटलाय मनमोहक सुगंध ___ रावांना केले मी हृदयात बंद.
कमळात उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती ___ रावांच नाव घेते मी खरी भाग्यवती.
संसार रुपी पुस्तकाचे उघडते पाहिले पान ___ रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
बरसला पाऊस दरवळली माती ___ रावांसोबत फुलवेन नवीन नाती.
बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र ___ रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र.
अक्षता पडताच अंतरपाट झाला दूर ___ रावांमुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर.
चंदेरी समुद्रात रुपेरी लाटा ___ रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

मकरसंक्रांती स्पेशल मराठी उखाणे (Makar Sankranti Ukhane)

अंबाबाई देवीला अलंकाराचा साज ___ रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज.
नाव घ्या नाव घ्या, असतो आग्रह सर्वांचा ___ चे नाव असते हृदयात पण प्रश्न उरतो उखाण्याचा.
आपुलकीने भरलेलं सासर, सारे कसे हौशी ___ रावांच नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी.
संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान ___ रावांच्या जिवावर देते हळदी कुंकाच वान.
संक्रांतीच्या दिवशी देतात वान ___ रावांमुळे मिळाला मला हळदी कुंकवाचा मान.
पौर्णिमेच्या चंद्राभोवती झाली चांदण्यांची दाटी ___ रावांचे नाव घेते आज संक्रांतीसाठी.
तिळगुळाचा गोडवा आहे किती छान ___ रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.
उखाणा घेतल्याने मिळतो सुप्तगुणांना वाव आज आहे संक्रांत घेते ___ चे नाव.

घास भरवतानाचे मराठी उखाणे

चंदेरी प्रकाश पौर्णिमेच्या चंद्राचा ___ रावांना घास भरवते बुंदीच्या लाडवाचा.
लग्नाच्या सोहळ्याचा थाट आहे खास ___ रावांना भरवते ( पदार्थाचे नाव ) चा घास.
चांदीच्या ताटात गव्हाची रास ___ रावांना भरवते खिरीचा घास.
जेथे सुख शांती समाधान, तेथे असे लक्ष्मीचा वास ___ रावांना भरवते गुलाबजाम चा घास.
फुलपाखरांना नेहमी फुलांचाच ध्यास ___ रावांना भरवते ( पदार्थाचे नाव ) चा घास.
घरभर पसरला अगरबत्ती चा सुवास ___ रावांना भरवते ( पदार्थाचे नाव ) चा घास.
गळ्यात डोरल, कानात झुबे, दंडाला आहे बाजूबंद ___ रावांच नाव घेते भरवून त्यांना श्रीखंड.
सोसाट्याचा वारा सुटला उठली सगळीकडे धूळ ___ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते मी तिळगुळ.
उखाणा ऐकायला जमली मंडळी खास ___ रावांच नाव घेऊन भरवते श्रीखंडाचा घास.
( मुलाकडील आडनाव ) चा मुलगा ( मुलीचे आडनाव ) ची मुलगी जोडी आहे झकास रावांच नाव घेऊन भरवते बासुंदीचा घास.
महादेवाच्या मंदिरात दरवळतो फुलांचा सुवास ___ रावांचे नाव घेऊन भरवते ( पदार्थाचे नाव ) चा घास.
आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास ___ ना भरवते लाडूचा घास.

Modern marathi ukhane for bride

प्रेमाच्या चौकटीत किती पण फिरा शोधून पण सापडणार नाही ___ सारखा हिरा.
तो दिसतो इतका सुंदर की नजर त्याच्याकडे वळते ___ च्या क्युट स्माईल ने माझे टेन्शन पळते.
चंद्राला पाहून चांदणी गोड लाजते ___ राव आणि माझी जोडी चारचौघात उठून दिसते.
पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वॉटर ___ रावांचे नाव घेते (Bhavache Nav) ची सिस्टर.
लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने ___ रावांच्या जीवावर मी राहते मानाने.
हो नाही म्हणता म्हणता झाले लग्न आमचे ___ मुळे मिळाले सुख सौभाग्याचे.
हृदयात दिले स्थान दिला हातात हात ___ रावांच्या जीवनात फुलवते प्रितीची फुलवात.
भारताने दिली जगाला एल अनमोल भेट झिरो ___ आहे माझा मोस्ट फेवरेट हीरो.
लग्न झाले आमचे आता बहरुदे संसार वेल ___ रावांचे नाव घेऊन वाजवते ( मुलाकडील आडनाव ) घराची बेल.
शेवंतीची वेणी मोगऱ्याचा गजरा आमच्या दोघांवर सगळ्यांच्या नजरा.
सागरात लाटा, दिव्यात ज्योती ___ आहे माझा अनमोल मोती.
संपूर्ण गावात असे ठिकाण सापडणार नाही जिथे आमच्या ___ रावांच नाव नाही.
पहाटे उठून करावी देवाची पूजा ___ रावांच्या जिवावर करते मी मजा.

Funny Marathi Ukhane For Bride

लग्नाच्या पंक्तीत घेतले नाव खास ___ रावांच्या घशात अडकला ( Pdarthache nav ) चा घास.
तेलाच्या दिव्याला कापसाची वात ___ रावांशी लग्न केले लागली आयुष्याची वाट.
कोकणातून आणले फणस आणि काजू ___ रावांना शिव्या घालायला मी कशाला लाजू.
नाव घे नाव घे उखाणा काही सुचत नाही आणि नाव कोणा कोणाच घेऊ मला काही कळत नाही.
वांग्याचा केला रस्सा, फिश केला फ्राय ___ भावच देत नाय किती केल ट्राय.
एकत्र काम केलं तर काम होईल लवकर, मी करते भाजी आणि तू लाव कुकर.
चांदीच्या ताटात सातारी कंदी पेढे ___ राव तेवढे हुशार बाकी सगळे वेडे.
पुरण पोळी ला तूप लावते साजूक ___ राव आमचे खूपच नाजूक.
एक होता माऊ, एक होती चिऊ ___ चे नाव घेतले आता डोक नका खाऊ.
लग्नात नाव घेणे हा कसला कायदा तुमची तर होते करमणूक पण आमचा काय फायदा?
आकाशातून उतरली परी ___ रावांच नाव घेते आता जा आपापल्या घरी.
चांदीच्या परातीत ठेवले गहू लग्नच नाही झालं तर नाव कोणाच घेऊ.
वांग्याच्या भाजीत घातलाय स्पेशल मसाला ___ च नाव माहिती आहे मग मला कशाला विचारता.
फेसबुकवर झाली ओळख, इंस्टाग्रामवर प्रेम जुळले ___ आहे किती रिकामटेकडे हे लग्नानंतर कळले.

लग्नामध्ये (lagnatil ukhane) नवरीचा उखाणा ऐकण्यासाठी सर्वच जण आतुर असतात त्यामुळे लग्नातील नवरीचे उखाणे हे अर्थातच खास आणि नवीन (New Marathi Ukhane) असायलाच हवेत. लग्नात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये नववधूला उखाणा घ्यावा लागतो.

आशा आहे तुम्हाला Vinodi Ukhane आवडले असतील. तेव्हा लग्नाची तयारी करत असताना ukhane in marathi for pooja या लेखातील उखाणे, तुम्ही तुमच्या लग्नात घेण्यासाठी नक्कीच निवडले असतील. Marathi ukhane naav ghene हे तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा.

तसेच तुम्ही ज्यांच्यासाठी उखाणा शोधत आहात त्यांचे नाव वरील चौकोनात टाका म्हणजे तुम्हाला सर्व उखाणे तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने तयार मिळतील तसेच कोणत्याही उखाण्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आवडलेला उखाणा कॉपी होईल.

Read More
Categories