LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

1 शेअरवर कंपनी देणार 140 रुपयांचा डिव्हीडंट, जाणून घ्या नाव आणि रिकॉर्ड डेट

Published By LifelineMarathi.com
On

देशातील मोठी टू व्हीलर आणि फोर व्हीलर कंपनी बजाज ऑटोने डिव्हीडंट देण्याचे जाहीर केले आहे. कंपनी तिच्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येकी 1 शेअरवर 140 रुपयांचा डिव्हीडंट देणार आहे. म्हणजेच रिकॉर्ड डेट पर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे ह्या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना प्रत्येकी 1 शेअर्सवर 140 रुपयांचा फायदा मिळेल, तसेच आम्ही सांगू इच्छितो, आज शेअर मार्केटमध्ये कंपनी एक्स डिव्हीडंट स्टॉकच्या रूपात ट्रेड करत आहे.

Bajaj Auto Dividend Record Date

25 एप्रिल 2023 रोजी शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, बजाज ऑटोने सांगितले की 10 रुपये फेस वैल्यू असणाऱ्या एक शेर वर 1400 टक्के डिव्हीडंट दिला जाईल. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 140 रुपये पर्यंतचा डिव्हिडंड मिळेल, कंपनीने 30 जून 2023, म्हणजेच आज ही रिकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

बुधवारी कंपनीच्या शेअरची किंमत 2.56 टक्क्यांच्या तेजीसह 4725 रुपयांच्या लेवलवर बंद झाली. सहा महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करून आतापर्यंत होल्ड केले असतील त्यांना कंपनीकडून 30 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स मिळाले असतील.

शेअर बाजारात बजाज ऑटो शेअर्सचा 52 वीक हाई 4829.90 रुपये प्रति शेयर तसेच 52 वीक लो 3461.25 रुपये प्रति शेयर आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.