एक शेअर वर 169 रुपये डिविडेंड देत आहे ही कंपनी, जाणून घ्या रेकॉर्ड डेट
पुढील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये एमआरएफ लिमिटेड (MRF Ltd) एक्स डिव्हीडंट स्टॉक म्हणून ट्रेड करेल. कंपनीने तीन मे 2023 रोजी मार्च तीमाही निकाला सोबत डिविडेंड देण्याचे जाहीर केले होते. कंपनीने पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 169 रुपयांचा डिविडेंड देण्याचा निर्णय घेतला आहे.
3 मे 2023 रोजी MRF Ltd share ने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये 10 रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर 1690 % डिविडेंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येकी एक शेअर वर 169 रुपयांचा फायदा होईल, तसेच कंपनीकडून डिविडेंड साठी 20 जुलै 2023 ही तारीख रिकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे.
मागील एका महिन्याच्या कंपनीच्या स्टॉक बद्दल बोलायचे झाले तर एमआरएफ लिमिटेड च्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे, तर मागील एका वर्षात पोझिशनल गुंतवणूकदारांना 26 टक्क्याहून अधिक फायदा मिळाला आहे. एमआरएफ लिमिटेड शेअर चा 52 आठवड्यांचा उचांक 104494.95 रुपये प्रति शेअर इतका आहे. हा स्टॉक मार्केट मधील सर्वात महागडा स्टॉक मानला जातो.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.
जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.