Wipro ने बायबॅकची तारीख वाढवली: आता कंपनी करेल या दिवसापर्यंत बायबॅक
Wipro ने बायबॅक ऑफरची तारीख एका दिवसांनी वाढवली आहे आता गुंतवणूकदार 30 जून 2023 पर्यंत त्यांचे शेअर बायबॅक साठी वापरू शकतात. कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.
विप्रो ने सांगितले आहे की, यापूर्वी शेअर बाजारात बकरी ईद ची सुट्टी 28 जूनला होती मात्र नंतर ती बदलून 29 जून करण्यात आली त्यामुळे विप्रोने बायबॅक ची तारीख ही एका दिवसांनी वाढवली आहे.
आत्तापर्यंत विप्रो शेअरचा दर 382 रुपयावर आहे याचवेळी कंपनी 445 रुपये प्रति इक्विटी शेयर बायबॅक करत आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक शेअरवर 60 रुपयांपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. गुंतवणूकदारांनी या बायबॅक फायदा घ्यावा असे तज्ञांचे म्हणणे आहे.
विप्रोचे 1200 करोड रुपयांचे बायबॅक सध्या सुरू आहे. विप्रोचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बायबॅक आहे, जो गुंतवणूकदारांना खूप चांगली कमाईची संधी देत आहे. विप्रो शेअर बायबॅक 22 जून पासून सुरू झाला आहे. मात्र आता तो 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे, यापूर्वीचा त्याची तारीख 29 जून होती. विप्रोचा शेअर्सचा बायबॅक साठी रिकॉर्ड डेट 16 जून होती.
बायबॅक संपल्यानंतर, विप्रोच्या बायबॅकसाठी रजिस्ट्रारकडून पडताळणीसाठी 4 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पुढे, रजिस्ट्रारने स्टॉक एक्स्चेंजला निविदा केलेले इक्विटी शेअर्स स्वीकारण्याची किंवा न स्वीकारण्याची तारीख 6 जुलै ही निश्चित केली आहे.
बायबॅकद्वारे, विप्रो त्यांच्या शेअरहोल्डिंगच्या प्रमाणात इक्विटी शेअर्स धारण करणार्या गुंतवणूकदारांना सरप्लस अमाऊंट पाठवण्यास सक्षम असेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा एकूण परतावा वाढेल.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.