कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर मिळताच गुंतवणूकदार पडले तुटून, स्टॉक ची किंमत 17 % वाढली
JBM Auto कंपनीने 13 जुलै 2023 रोजी शेअर मार्केटला सांगितले की, जेबीएम ऑटो कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. जेबीएम ऑटो चे शेअर शुक्रवारी चांगलेच तेजीत दिसून आले.
जेबीएम ऑटोच्या शेअरवर शुक्रवारी गुंतवणूकदार तुटून पडले त्यानंतर कंपनीचे शेअर 17.71 टक्क्यांनी वाढले सकाळी दहाच्या सुमारास कंपनीचे शेअर 11.79 टक्क्यांच्या वाढीसह 1470.10 रुपयांवर ट्रेड करत होते.
बीएससी वेबसाईट वरील उपलब्ध माहितीनुसार कंपनी दिल्ली, ओडीसा, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांना इलेक्ट्रिक बसचा सप्लाय करणार आहे. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, सिटी बस, स्टॉफ बस, टर्मक कोच इत्यादी ऑर्डर नुसार सप्लाय केले जाईल. या बसची लांबी 9 मिटर ते 12 मिटर पर्यंत असेल.
मागील एक महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 57% ची वाढ झाली आहे तसेच सहा महिन्यांपूर्वी जेबीएम ऑटो चे शेअर ज्या गुंतवणूकदारांनी खरेदी करून ठेवले असतील त्यांना 166% परतावा मिळाला असेल. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 235 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.
जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.