LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

अडानी ग्रुपच्या या शेअरवर फिदा झाले म्युचुअल फंड, जाणून घ्या स्टॉकची नावे

Published By LifelineMarathi.com
On

म्युचुअल फंड अडाणी ग्रुपच्या काही कंपन्यांवर फिदा झाले आहेत. ICICI सिक्युरिटीजच्या संशोधनानुसार, अडानी ग्रीन, अडानी ट्रांसमिशन आणि अडानी एंटरप्राइजेज या अशा कंपन्या आहेत ज्यामध्ये एएमसी ने जून मध्ये त्यांची भागीदारी वाढवली आहे.

म्युचुअल फंडने लार्ज कॅप योजनांमध्ये जून महिन्यात अदानी ग्रीनमध्ये 167 कोटी रुपयांचे 18 लाख शेअर्स खरेदी केले, तर मे महिन्यात 136 कोटी रुपयांचे 14 लाख शेअर्स खरेदी केले. म्युचुअल फंडने अडाणी ट्रान्समिशन मध्ये 15 लाख शेअर्स खरेदी केले. जूनमध्ये अडाणी एंटरप्राइजेस मध्ये 3169 कोटी किमतीचे 133 लाख शेअर्स खरेदी केले गेले.

काही जणांनी अडानी पोर्ट्स, अंबुजा सीमेंट्स आणि एसीसी चे शेअर खरेदी केले. अल्फानिटीचे सह-संस्थापक यूआर भट यांच्या मते, ग्रुप मधील इतर कंपन्या विशेषतः नवीन काळातील व्यवसायांचे बेंचमार्क केले जाऊ शकले नाही आणि त्यामुळे गुंतवणूकदार यांपासून दूर राहिले.

राजीव जैन यांनी स्थापन केलेल्या जीक्यूजी ने 3 मार्च रोजी एईएल, अडानी पोर्ट्स, अडानी ग्रीन आणि अडानी ट्रांसमिशन खरेदी करण्यास सुरुवात केली आणि नंतर बाजारातील खरेदीद्वारे त्यांच्यातील भागीदारी वाढवली.

अदानी एंटरप्रायझेस 52 आठवड्यांच्या नीचांक पातळी 1017.45 रुपयावरून वाढून 2423 पर्यंत पोहोचले. अडानी ग्रीन शेअर 965 रुपयांवर ट्रेड करत होता, जो हिंडनबर्गच्या अहवालानंतर 439 रुपयांवर पोहोचला. तर अडाणी ट्रान्समिशन चे शेअर मंगळवारी 754 रुपयांवर ट्रेड करत होते.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.