75 पैशांच्या शेअरने बनवले करोडपती, एक्सपर्ट्सने दिले त्यांचे मत!
Multibagger Stocks: 75 पैशांच्या या शेअरने झटक्यात गुंतवणूकदारांना बनवले करोडपती. लॉन्ग टर्म सोबतच शॉर्ट टर्म मध्येही हा शेअर गुंतवणूकदारांसाठी कायदेशीर ठरला आहे. एक्सपर्ट च्या म्हणण्यानुसार, अजूनही या शेअरमध्ये तेजी बघायला मिळू शकेल. तर तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का हा स्टॉक?
स्मार्ट ग्रिड, गैस आणि इलेक्ट्रिसिटी यासारख्या मीटरिंग सेवा पुरवणारी कंपनी जीनस पावर एंड इंफ्रास्ट्रक्चर्स (Genus Power Infrastructures) चा शेअर गुंतवणूकदारांसाठी खूपच फायद्याचा ठरला आहे. शेअरने या महिन्यात 29 टक्के रिटर्न्स दिले आहेत, तर 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये हा शेअर 148 टक्क्यांच्या तेजीसह मागील आठवड्यात विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.
लॉन्ग टर्म मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने 46 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती व्यक्ती वीस वर्षांमध्ये करोडपती झाली असती. अशा प्रकारे 75 पैशाच्या या Penny स्टॉक ने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
जीनस पॉवरने 15 टक्क्यांच्या भागीदारीच्या बदल्यात 520 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एसपीवी (स्पेशल पर्पज वेईकल) सेटअप करण्यासाठी जीआईसी सोबत करार केला आहे. या एसपीवी मध्ये जीआईसी ची भागीदारी 74% आणि जीनस कडे 26 टक्के भागीदारी असेल. यामुळे जीनस सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या स्मार्ट मीटर साठी बोली लावू शकेल.
याशिवाय ICICI सिक्युरिटीज चा असा अंदाज आहे की, जीनसच्या चिप सप्लायच्या अडचणी कमी होऊ शकतात. तसेच कंपनीच्या मजबूत ऑर्डर बैकलॉग मुळे आणि ऑर्डर पूर्ण करण्याच्या तेजीवर, आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये कंपनीचा 6 टक्के आणि 74% च्या CAGR सोबत रिवेन्यू वाढू शकतो. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज ने 185 रुपये टार्गेट सह हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. येथे पोस्ट केलेली माहिती ही एक्सपर्ट, ब्रोकरेज फर्म यांची वैयक्तिक मते आहेत. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.