सुजलॉन एनर्जी शेअर मध्ये जबरदस्त तेजी | तीन महिन्यांमध्ये दिला भरघोस परतावा
रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन प्रदाता कंपनी सुजलोन एनर्जीचे शेअर सातत्याने वाढताना दिसत आहेत. कंपनीला मिळालेल्या ऑर्डर आणि बॅलन्स शीट मुळे या स्टॉक मध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये जवळपास 6% वाढ झाली आणि कंपनीचे शेअर्स 14.80 रुपयांवर पोहोचले.
13 जून 2023 रोजी सुजलॉन शेअरची किंमत 15.76 रुपयांवर होती. ही किंमत स्टॉकची 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी आहे. जर मागील वर्षी म्हणजेच 28 जुलै 2022 रोजी या शेअरची किंमत पाहिली असता ती 5.43 रुपयांवर होती, तसेच या स्टॉकचा ऑल टाईम हाई 375 रुपये आहे.
गेल्या एका वर्षात सुझलॉन एनर्जीच्या शेअरच्या किमतीत वाढ होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये मजबूत आर्थिक प्रदर्शन सोबतच अनेक विंड एनर्जी प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करणे ही कारणे असू शकतात.
या शेअर ने केवळ किरकोळ गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले नाही तर मार्च 2023 या तिमाहीत कंपनीतील त्यांची भागीदारी वाढवण्यासाठी ही प्रवृत्त केले. बीएससी च्या तुलनेत या शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. तसेच एका महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 108% पर्यंतचे रिटर्न्स दिले आहेत.
मागील एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 140.86% वाढ दिली आहे. तेच मागील एका वर्षात सुझलॉन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28.94% रिटर्न्स दिले आहेत.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.