TCS च्या प्रॉफिट मध्ये जबरदस्त वाढ, कंपनीने 9 रुपये डिविडेंड देण्याचे केले जाहीर
TCS Q1 Result 2023-24:
भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी TATA Consultancy Services (TCS) च्या नेट प्रॉफिटमध्ये जून तिमाहीत जबरदस्त प्रॉफिट झाला आहे. टीसीएस ने बुधवारी आर्थिक वर्ष 2023 - 24 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 16.83 टक्क्यांची वाढ होऊन 11,074 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.एका वर्षापूर्वी कंपनीला 9,478 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. कंपनीच्या ऑपरेटिंग रेवेन्यू मध्ये वार्षिक आधारावर 12.55 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि तो 59,381 कोटी रुपये झाला आहे. मार्च तिमाहीत ते 59,162 कोटी रुपये होते.
TCS चा शेअर आज 3,280.95 रुपयांवर ओपन झाला होता. शेअरने दिवसभरात 3289 चा उच्चांक आणि 3250 चा नीचांक गाठला आहे. TCS चे शेअर बुधवारी 0.36 टक्क्यांनी घसरून 3260.20 रुपयांवर वर बंद झाले.
जून तिमाहीचे निकाल जाहीर करणारी TCS ही पहिली कंपनी आहे. सध्या IT सेक्टर चढ-उताराच्या टप्प्यातून जात आहे. भारतीय IT सेक्टर ची साईज 250 अरब डॉलर आहे.
TCS ने सांगितले की त्यांच्या बोर्डाने 1 रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या प्रत्येक शेअरवर 9 रुपये डिविडेंड देण्याचे जाहीर केले आहे आणि त्यासाठी 20 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
जून तिमाहीत TCS च्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. TCS ने सांगितले की जून तिमाहीच्या अखेरीस त्यांची कर्मचारी संख्या 615318 होती. TCS चे मार्केट कॅप 11.93 लाख कोटी रुपये आहे. मार्केट कॅप नुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर TCS ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.