येत आहे टाटाच्या या कंपनीचा IPO - सेबीने दिली परवानगी | कमाईची मोठी संधी!
Tata Technologies IPO:
टाटा टेक्नॉलॉजी चा आयपीओ लवकरच येत आहे गुंतवणूकदार अनेक दिवसापासून याची वाट पाहत होते. तुम्ही टाटा ग्रुपचे गुंतवणूकदार असाल आणि टाटाकडून IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
खरंतर खूप काळाच्या प्रतीक्षेनंतर टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लॉन्च होत आहे ज्याचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजी, या कंपनीच्या IPO ला SEBI ने मान्यता दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजीजने मार्च महिन्यात IPO साठी अर्ज केला होता.
टाटा समूहाच्या या कंपनीचा IPO अनेक वर्षांनंतर येणार आहे. यापूर्वी, टाटा ग्रुपची कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO जुलै 2004 मध्ये आला होता. गुंतवणूकदार या IPO ची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.
Tata Technologies ही टाटा मोटर्सची सहायक कंपनी आहे. टाटा मोटर्सचा सध्या या कंपनीत 74.69 टक्के हिस्सा आहे.अल्फा टीसी होल्डिंग पीटीई कडे टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 7.26 टक्के हिस्सा आहे, तर टाटा कैपिटल ग्रोथ फंडचा 3.63 टक्के हिस्सा आहे. टाटा टेक्नॉलॉजीज या IPO द्वारे सुमारे 9.57 करोड शेअरची विक्री करेल.
सन 2004 मध्ये आला होता IPO
यापूर्वी, टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा आयपीओ 2004 साली आला होता. आज TCS ही देशातील दुसरी सर्वात मूल्यवान कंपनी आहे. आकडेवारीनुसार, टाटा ग्रुप एकूण मार्केट कैप सुमारे 11.7 लाख करोड रुपयांवर पोहोचले आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.