LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

या IPO ने पहिल्याच दिवशी केले गुंतवणूकदारांचे पैसे डबल | गुंतवणूकदारांचा झाला फायदाच फायदा

Published By LifelineMarathi.com
On

ड्रोन बनवणारी कंपनी IdeaForge Technology ने शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. या कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये शुक्रवारी 1305.10 रुपयांवर लिस्ट झाले. IPO मध्ये कंपनीचे शेअर 672 रुपयांना अलॉट झाले होते, तर पहिल्याच दिवशी या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 633.10 रुपयांचा तगडा फायदा करून दिला आहे.

IdeaForge चे शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये 1300 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. ड्रोन कंपनी IdeaForge Technology चा IPO 106.06 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या आयपीओ ला रिटेल इन्वेस्टर ने देखील चांगलीच पसंती दिली.

आयपीओ मध्ये 10टक्के भाग रिटेल इन्वेस्टर साठी राखीव होता आणि तो 85.20 पट सबस्क्राईब झाला. नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्स (NII) चा कोटा 58 पटीने सबस्क्राईब झाला, तसेच क्वॉलीफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) साठी 75% भाग रिजर्व होता तर तो 125.81 पट सबस्क्राईब झाला, आणि कर्मचाऱ्यांचा कोटा देखील 96.65 पट सबस्क्राईब झाला आहे.

IdeaForge Technologies चा IPO 26 जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला होता, आणि 30 जून रोजी याचे सबस्क्रीप्शन बंद झाले. IPO मध्ये कंपनीच्या शेअर्सची प्राईस बँड 638 ते 672 रुपये होती. IdeaForge या कंपनीचे शेअर्स 672 रुपये अप्पर प्राइज बॅंडवर अलॉट झाले होते.

रिटेल इनवेस्टर्स या IPO मध्ये किमान 1 आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अप्लाय करू शकत होते. IPO च्या एका लॉट मध्ये 22 शेअर्स होते. IdeaForge च्या पब्लिक इश्यू ची टोटल साइज 567 कोटी रुपये आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.