या स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 12 जुलैला होईल ओपन | पहा प्राइस बँड आणि कंपनीचे नाव
Utkarsh Small Finance Bank चा IPO 12 जुलै 2023 रोजी सबस्क्रीप्शन साठी ओपन होईल. या IPO च्या माध्यमातून 500 कोटी रुपये उभारण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.
Utkarsh Small Finance या बँकेचे मुख्यालय वाराणसी येथे आहे. 14 जुलै 2023 पर्यंत या IPO ला सबस्क्राईब करू शकता. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO अंतर्गत, बँकेने प्रति शेअर 23 - 25 रुपये प्राइस बैंड निश्चित केली आहे. बँकेने या आयपीओ साठी 600 शेअर्सची लॉट साईज निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करण्याची परवानगी असू शकेल.
Utkarsh Small Finance Bank IPO च्या स्ट्रक्चर मध्ये 75 % भाग क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल साठी राखीव असेल, 15 % भाग एनआईआई साठी तर, 10 % भाग रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.
हा IPO 12 ते 14 जुलै दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी ओपन असेल. बँक शेअर्सचे अंतिम वाटप 19 जुलै 2023 रोजी करेल. बँकेचे शेअर्स 21 जुलैपर्यंत पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा केले जातील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 24 जुलै 2023 रोजी होण्याची शक्यता आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO अंतर्गत 500 कोटी नवीन शेअर जारी केली जातील. Utkarsh Small Finance Bank ची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. 2017 मध्ये कंपनीने आपले कामकाज सुरू केले. बँक विविध वित्तीय सेवा देते ज्यामध्ये, सेविंग अकाउंट, सॅलरी अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग आणि फिक्स्ड डिपॉजिट अकाउंट यांचा समावेश आहे तसेच, बँक लॉकर सुविधा देखील प्रदान करते.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.