LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

ICICI Securities डी-लिस्टिंगसाठी तयार, शेअर्सचे काय होईल?

Published By LifelineMarathi.com
On

ICICI सिक्युरिटीज शेअर डिलिस्टिंग:

ICICI सिक्युरिटीजच्या डिलिस्टिंगला कंपनीच्या बोर्ड बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. देशातील पाचवी सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी आयसीआयसीआय सिक्युरिटीज डिलिस्टिंगनंतर तिच्या मूळ कंपनी आयसीआयसीआय बँकेची उपकंपनी बनेल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज डिलिस्टिंग केल्यानंतर, ICICI सिक्युरिटीजच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 100 शेअर्समागे ICICI बँकेचे 67 शेअर्स वाटप केले जातील. विविध प्रकारच्या रेग्यूलेटरी मंजुरींमुळे, डिलिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 महिन्यांचा वेळ लागू शकतो.

गुरुवारी कंपनीच्या डायरेक्टर मंडळाच्या बैठकीत डीलिस्टिंगच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ज्यानुसार ICICI बँक आता ICICI सिक्युरिटीजचे इक्विटी शेअर्स रद्द करण्याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स जारी करेल. ICICI बँकेच्या मते, ICICI सिक्युरिटीज हा कमी भांडवल असलेला व्यवसाय असल्याने कंपनीमध्ये अतिरिक्त भांडवल घालण्याची गरज नाही.

पाचवा सर्वात मोठा स्टॉक ब्रोकर:

ICICI सिक्युरिटीज 6.8% मार्केट शेअरसह भारतातील पाचव्या क्रमांकाचा स्टॉक ब्रोकर आहे. त्याचे NSE सक्रिय ग्राहक मे 2023 अखेर 2.1 मिलियन एवढे होते.

सन 2018 मध्ये ICICI सिक्युरिटीजचा IPO आला होता. या स्टॉक इश्यूची किंमत 520 रुपये प्रति शेअर होती परंतु 431 रुपयांवर शेअर लिस्ट झाला. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या डीलिस्टिंगचे कारण हे देखील आहे की, स्टॉक अंडरपरफॉर्म करत होता. डिलिस्टिंगनंतर, स्टॉकमध्ये किंचित तेजी दिसून आली. बुधवारी आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा शेअर 614 रुपयांवर आणि आयसीआयसीआय बँकेचा शेअर 937.45 रुपयांवर क्लोज झाला.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.