1 लाखाचे झाले 5 लाख, २ रु. च्या पेनी स्टॉक ने बदलले गुंतवणूकदारांचे नशीब?
कोरोना महामारी नंतर शेअर मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे मिष्ठान फूड्स. हा एक स्मॉल कॅप FMCG शेअर आहे, ज्याचे मूल्य मागील 2 वर्षात सुमारे 2.20 रुपयांवरून 11.30 रुपये प्रति शेअर वाढले आहे.
नोमुरा सिंगापुर द्वारे समर्थित FMCG स्टॉक ने मे 2023 मध्ये मार्च तिमाही साठी मजबूत निकाल जाहीर केला आहे कंपनी वाढीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विविध उत्पादनांचे लॉन्च करणे हे आहे, असा या FMCG कंपनीचा दावा आहे.
गेल्या सहा महिन्यात या मिष्ठान फूडच्या शेअरची किंमत 9.05 रुपये वरून 11.30 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीमध्ये 25% वाढ नोंदवली आहे. YTD कालावधीमध्ये या कंपनीचे मूल्य 25 टक्क्यांनी वाढले आहे. मागील एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांची वाढ दिली आहे. तर गेल्या दोन वर्षात या स्टॉक ने गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या स्मॉल कॅप कंपनीमध्ये 1 लाखांची इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्या एक लाखाचे पाच लाख रुपये झाले असते. मिष्ठान फुड्स कडून भारतीय एक्सचेंज ला दिलेल्या माहितीनुसार नोमुरा सिंगापूर ने कंपनीतील त्यांची भागीदारी वाढवली आहे. कंपनीने सांगितले आहे की आशियामधील तांदळाच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी ही कंपनी आवश्यक ती पावले उचलत आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.