Foxconn ने वेदांताला दिला मोठा झटका | 1.5 लाख कोटी रुपयांचे डील झाले कॅन्सल
ताइवान मधील कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी भारतीय दिग्गज कंपनी वेदांता लिमिटेड सोबतचे सेमीकंडक्टर जॉइंट वेंचर संयुक्त उपक्रमातून माघार घेतली आहे.
होन हाई टेक्नॉलॉजी ग्रुप (Foxconn) ने सांगितले की ते सेमीकंडक्टर उपक्रमातून फॉक्सकॉनचे नाव माघारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वेदांता कंपनीचे शेअर सोमवारी 282.45 रुपये या लेवलवर बंद झाले आहेत.
हा प्रकल्प उभारण्यासाठी गेल्यावर्षी झाला होता करार:
कॉन्ट्रैक्ट इलेक्ट्रॉनिक्स मेकर फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीने गुजरात मध्ये सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन प्लांट उभारण्यासाठी मागील वर्षी भारतीय कंपनी वेदांता सोबत करार केला होता. या प्रकल्पामध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार होती.
Foxconn ने वेदांता सोबतचा संयुक्त उपक्रम पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ताइवान कंपनीने एका निवेदनात सांगितले आहे. वेदांतने या प्रकरणी तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Foxconn आणि वेदांता ने प्रोडक्शन प्लांटसाठी करार केला होता. फॉक्सकॉनने ही डील यशस्वी करण्यासाठी वर्षभराहून अधिक काळ वेदांता सोबत काम केले होते.
फॉक्सकॉनने जारी केले निवेदन:
फॉक्सकॉनने निवेदनात असे सांगितले आहे की, परस्पर करारा अंतर्गत विविध संधी आणि त्यांच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी फॉक्सकॉनने वेदांता सोबतचा हा प्रकल्प पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवेदनानुसार असे सांगण्यात आले आहे की, होन हाई टेक्नोलॉजी ग्रुप (फॉक्सकॉन) आणि वेदांता यांनी सेमीकंडक्टरची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गेल्या वर्षभरात खूप परिश्रम घेतले आहे, कंपनीने हा एक चांगला अनुभव असल्याचे सांगितले आहे आणि भविष्यात दोन्ही कंपन्यांना याची मदतच होईल असे सांगितले आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.