या आठवड्यात या 3 मिडकैप स्टॉक मध्ये आली तेजी | तुमच्याकडे आहे का यातील स्टॉक?
भारतीय शेअर बाजारात सध्या कमालीची तेजी पाहायला मिळत आहे कारण सर्वच इंडेक्सनी त्यांचा ऑल टाईम हाय गाठला आहे. तसेच मागील आठवड्यात शुक्रवारी निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी ने विक्रमी उच्चांक गाठला.
तसेच स्मॉल-कैप आणि मिड-कैप इंडेक्स ने देखील नवीन उच्चांक गाठला. बीएसई मिडकैप इंडेक्स 0.59 टक्क्यांनी वाढून 29164.02 वर ट्रेड करत आहे.
SJVN Ltd:
SJVN हा पावर इंडस्ट्रीचा भाग आहे. ट्रेंडलाइन च्या डेटा नुसार हा शेअर मागील तीन ट्रेडिंग सेशन मध्ये 15.4 टक्क्यांनी वाढला आहे, तर मागील एका महिन्यात स्टॉक मध्ये 30 टक्क्यापर्यंत तेजी पाहायला मिळत आहे. हा स्टॉक 6.41 टक्क्यांनी वाढून 46.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.
JSW Energy:
JSW Energy हा स्टॉक सात महिन्यांच्या उच्चांकावर ट्रेड करत आहे. या स्टॉकने सात महिन्यात पहिल्यांदाच तीनशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 13.60 टक्क्यांनी वाढला आहे. बीएससी वर हा स्टॉक 2.31 टक्क्यांनी वाढून 308.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 17.15 टक्क्यांनी वधारला आहे.
Hindustan Petroleum Corporation Limited:
या कंपनीचा शेअर बीएससी वर 4.68 टक्क्यांनी वाढून 304.35 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 18.6 टक्के तर गेल्या एका महिन्यात शेअर 15.94 टक्क्यांनी वधारला आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.