वंदे भारत ट्रेनची ऑर्डर मिळताच या शेअर मध्ये आली तेजी l 30 रुपयांवरून पाचशे रुपयांच्या पार गेला शेअर
रेल्वे स्टॉक टीटागढ़ रेल सिस्टम्सच्या शेअर्स ने मागील तीन वर्षांमध्ये मल्टी बर्गर परतावा दिला आहे या कंपनीच्या शेअर्सने तीस रुपयांवरून पाचशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच कंपनीच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात जवळपास 1600 टक्के पर्यंतचा परतावा दिला आहे. या कंपनीला वंदे भारत गाड्यांच्या ऑर्डर मिळाल्या होत्या त्यामुळे कंपनीच्या शेअर मध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे.
या कंपनीचे शेअर्स 22 मे 2020 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 30 रुपयांवर होते. तर 3 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएससी वर 509.40 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या तीन वर्षात 1600 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
टीटागढ़ रेल सिस्टम्स चे शेअर्स गेल्या एका वर्षात 383% ने वाढले आहेत. 4 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएससी वर 509.40 रुपयांवर पोहोचले तसेच मागील सहा महिन्यात या शेअरमध्ये 118 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे.
कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 514.35 रुपये आहे, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे 102.05 रुपये.
ब्रोकरेज हाऊस अरिहंत कैपिटल मार्केट्स चे असे म्हणणे आहे की, कंपनीचे शेअर्स एका वर्षात 686 रुपये पर्यंत पोहोचू शकतात. ब्रोकरेष हाऊसचे असे म्हणणे आहे की टीटागढ़ रेल सिस्टम्स कडे 275.5 बिलियन रुपयांची मजबूत ऑर्डर बुक आहे. ब्रोकरेज हाऊस च्या म्हणण्यानुसार वंदे भारत ट्रेन आणि पुढे जाऊन व्यवसाय वाढीला चालना मिळेल.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.
जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.