टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत लक्षणीय वाढ | शेअर बनला रॉकेट
टाटा मोटर्स व्यवसायिक आणि प्रवासी वाहन उद्योगातील एक प्रमुख कंपनी आहे. त्याच्या शेअर्सच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. कोविड महामारी नंतर या कंपनीच्या स्टॉक मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 26 जून 2020 मध्ये हा शेअरमधे 101 रुपये प्रति शेअर वरून 498.1% ने लक्षणीय वाढ झाली आहे.
2023 मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 44 टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली, तसेच गेल्या तीन महिन्यांमध्ये या शेअरने 30 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे, आणि हा शेअर वारंवार 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचत आहे.
स्टॉक मधील उत्कृष्ट कामगिरी सोबतच टाटा मोटर्सने यावर्षी निफ्टी-फिफ्टी इंडेक्स मध्ये ही उत्कृष्ट कामगिरी दर्शवली आहे. त्यामुळे बाजारात या स्टॉक ची स्थिती आणखीनच मजबूत झाली आहे.
या कारणांमुळे देखील टाटा मोटर्सचे शेअर्स तेजी मध्ये आहेत.
1. टाटा टेक IPO ला मंजूर:
टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओच्या घोषणेमुळे आणि टाटा मोटर्सने टाटा टेकमधील आपल्या हिस्सेदारीचा काही भाग विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
टाटा टेक IPO ही टाटा समूहाची 20 वर्षांतील पहिली सार्वजनिक ऑफर म्हणून महत्त्वाची घटना आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आणि आवड निर्माण झाली आहे.
2. जेएलआर च्या वाढीचा वेग:
शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीचे श्रेय त्यांच्या लक्जरी शाखा, जगुआर लैंड रोवर (जेएलआर) च्या सकारात्मक दृष्टिकोनाला देखील दिले जाऊ शकते, ज्याने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 28 बिलियन पाउंड वार्षिक कमाईचा, अंदाज वर्तवला जात आहे, जो एका वर्षापूर्वी 22.81 बिलियन पाउंड होता.
टाटा मोटर्सने केलेली कामगिरी:
गेल्या महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 13% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसात स्टॉक 6% वर आहे. 30 जून 2023 रोजी टाटा मोटर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 598.0 रुपये तसेच 26 डिसेंबर 2022 रोजी 375.2 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांक आहे.
थोडक्यात टाटा मोटर्स बद्दल:
टाटा मोटर्स लिमिटेड ही एक आघाडीची जागतिक ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे, ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कार, एसयूव्ही, बस, ट्रक, पिकअप आणि संरक्षण वाहनांची विस्तृत अशी श्रेणी आहे. ही एक 34 बिलियन अमेरिकी डॉलर संघटना आणि एक अग्रगण्य जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन कंपनी आहे.
टाटा मोटर्सचे भारतात मजबूत अस्तित्व आहे, तसेच जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये त्यांची वाहने निर्यात होतात. कंपनीचे जगुआर लैंड रोवर, फिएट आणि डेमलर त्यांसोबतच अनेक ऑटोमोटिव उत्पादकांसह अनेक संयुक्त उपक्रम आहेत.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.