Jul 19, 2023
ही फायनान्स कंपनी देणार आहे डिव्हीडंट पहा रिकॉर्ड डेट
या फायनान्स कंपनीने गुंतवणूकदारांना डिव्हिडंट देण्याचे जाहीर केले आहे त्यासाठी कंपनीकडून रिकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
फायनान्स सेक्टर मधील कंपनी एंजल वन आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंट देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Angel One ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 9.25 रुपयांचा dividend देणार आहे आणि त्यासाठी 21 जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
या कंपनीने पहिल्या तिमाहिचा निकाल 13 जुलैला जाहीर केला होता आणि या निकालावरून कंपनीला कन्सोलीडेटेड नेट प्रॉफिट मध्ये 22 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि यासोबतच कंपनीचे टोटल नेट प्रॉफिट 221 कोटी रुपये झाले आहे.
एंजल वन कंपनीच्या शेअरची किंमत 1586 रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 1.77 टक्क्यांची वाढ झालेली आहे. तसेच मागील सहा महिन्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.30 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.