Jul 11, 2023
या 10 शेअर्सने गाठला 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक
बँक ऑफ बडोदा आणि जेएसडब्ल्यू स्टीलसह 10 स्टॉक्स ज्यांनी 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. तसेच या स्टॉकने गेल्या एका महिन्यात त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या स्टॉकने गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना सुमारे 16 % रिटर्न दिले आहेत. या स्टॉकने 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक 65.38 ला टच केले आहे.
बजाज ऑटो स्टॉकने गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना 2% परतावा दिला आहे तसेच बजाज ऑटोच्या स्टॉकनेही अलीकडेच 4950 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
गेल्या महिन्यात जेएसडब्ल्यू स्टीलच्या स्टॉक मध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. जेएसडब्ल्यू स्टॉकने 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक 813.8 रुपयांना टच केले आहे.
टेलिकॉम सेक्टर मधील कंपनी भारती एअरटेल च्या स्टॉकने मागील एका महिन्यात 5 टक्के रिटर्न दिले आहेत. या स्टॉकने 889.75 रुपये हा नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या स्टॉकने 52आठवड्यांचा नवीन उच्चांक म्हणजेच 101.44 रुपयांना टच केले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या स्टॉकने गेल्या एका महिन्यात 7 % रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या महिन्यात 10 टक्के रिटर्न दिले आहे. या कंपनीच्या स्टॉकने अलीकडेच 2755 रुपयांचा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही भारतातील शिप बनवणारी कंपनी आहे, जी भारतीय नौदल आणि इतर ग्राहकांसाठी नौदल जहाजे आणि पाणबुड्या बनवते. या कंपनीच्या स्टॉकने 1588.75 रुपयांचा हा नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.
बँक ऑफ बडोदा च्या शेअर मध्ये मागील महिन्यात सुमारे 9% तेजी पाहायला मिळाली. बँक ऑफ बडोदा च्या स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक 210.8 रुपयांना गाठले आहे.
टाटा मोटर्सच्या स्टॉकने गेल्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांना 9% रिटर्न्स दिले आहेत. टाटा मोटर्सच्या शेअरने 634.6 रुपये हा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला.
ऑटोमोटिव्ह टायर निर्माता कंपनी अपोलो टायर्सने 433.15 चा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे.
आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.